प्रतिनिधी:सुरेश बोरले
1970 साली भारत पाक युद्ध व निर्वासितांचा प्रश्न?ह्या दोन्ही सवालांनी भारत मोठ्या प्रमाणत त्रस्त आहे.कारण हा भाग पूर्वी,पश्चिम पाकिस्तानात फाळणी नंतर होता.पण त्याकाळी पाकिस्तानची कुरघोडी व यादवी बंडशाहीची झाली ती झळ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात पोहोचली.त्यावेळेस शेख मुजिबर रेहमान, माजी पंत प्रधान हसीनाशेख ह्यांचे वडील.ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली व सदर जुलुमशाही विरूद्ध देशा सोबत उभे राहिले.ह्या दरम्यान आंतरिक खून खराब व दंगलींमुळे ,तेथून लोंढेच्या लोंढे,निर्वासितांचे भारतात येऊ लागले.भारत म्हणजे, या घर आपलाच आहे!शेवटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, याची दखल घेतली आणि मुजीबर रेहमान यांनीही भारताकडे मदत मागीतली.याची कुण कुण पाकला लागली व शेवटी युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली.इंदिराजींनी तिन्ही सेना प्रमुखांशी मसलत करून,युद्ध पुकारले,पाकने पहिला हल्ला केला व युद्धास सुरुवात झाली.भारतीय सेनेने हे युद्ध जिंकले.स्वतंत्र “बांगलादेश” निर्माण झाला.लोक तर आता म्हणतात,की तत्कालीन सरकार भारताला ह्या युद्धाच्या खाईत लोटल.कारण त्या दिवसांपासून महागाई व कर प्रणाली ह्या देशात सुरू झाली.निर्वासित कर तर अजून पर्यंत बेस्ट बस घेत होती.अजून पर्यंत भारताची परस्थिती कधीच सुधारली नाही.नाहीतर आज भारत प्रगत राष्ट्रात गणला गेला असता.ह्या कारणास्तव भारत 50वर्षे मागे रहीला आहे.हे मोठं दुःख भारतीय जनता आज पर्यंत, विनाकारण सहन करीत आहे.बांगला देश आझाद झाला.पण भारत शून्यच राहिला.
आज बांगला देश,
श्री लंका,नेपाल हे देश!चीनच्या कर्जाखाली,दबलेले आहेत.तेथील जनतेची ससे होल्पट झालेली आहे.आंतरिक यादवी आहे.हीच अवस्था पाकची आहे.पण अनेक दिवसांपासन,बांगलादेशात आरक्षणाच्या नावाखाली!दंगली उसळलेल्या आहेत.ज्या प्रमाणे रशियामधे क्रांती होऊन दंगली झाल्या व रशियन कम्युनिस्ट निर्माते,स्व.लेनिन ह्यांचे पुतळे तेथील जनतेने पाडून,त्यावर ते नाचले व नासधूस केली.हीच परिस्थिती बांग्लादेशात सध्या आहे.स्वतंत्र बंग निर्माता,राष्ट्रपती मुजिबर रेहमान ह्यांचे पुतळे हातोडे हाती घेऊन,तेथील जनता ध्वस्त्त करीत आहे.मुद्दा आहे आरक्षणाचा मग ही नासधूस करायची गरजच काय?येथे मोठा संशय कल्लोळ आहे.कोणत्या बाहेरच्या शक्तीचा हात आहे?हा प्रश्न जगाला पडलेला आहे.खास करून भारताला!कारण त्याचा संपूर्ण भार भारतावर पडणार आहे,हे निश्चित आहे.आधीच भारतावर करोडो कोटींचे कर्ज आहे,मग ह्यांची खातिरदारी करताना काय परिस्थिती होईल हे भारतीय जनतेने ठरवावे.
सदर दंगलींचे कारण काय तर आरक्षण!तर 1972 पासून येथील राज्य घटने प्रमाणे,कांहीं आरक्षणे आहेत!त्यामधे 30टक्के आरक्षण,हे बांगलादेश स्वतंत्र मुक्ती संग्रामात ज्यांनी आपली बलिदाने दिली,त्यांच्या वारसांना आरक्षण आहे.10टक्के आरक्षण हे मागास वर्गाला ग्रामीण भागात आहे.10टक्के आरक्षण हे महिलांसाठी नोकरीत आहे.
तर 5टक्के आरक्षण के धार्मिक अल्प संख्यकांसाठी आहे.1टक्का आरक्षण हे दिव्यांगांसाठी आहे.ह्या रथ चक्रात 44टक्के जग ही अनारक्षित आहे.तेथील जनतेच म्हणण आहे की स्वतंत्र सेनानी आरक्षण बंद करा व त्यांनाही सामान्य जनतेचे नियम लागू करा.कारण बेकारीची झळ ही सामान्यांना अधिक बसत आहे.1975 पासन येथे हसीना शेख हे नाव प्रख्यात आहे.त्या अनेक वर्षे पंतप्रधान
राहिल्या.त्या राष्ट्रपती शेख मुजीबर रेहमान ह्यांच्या कन्या असल्याने,वडिलांची ख्याती त्यांच्या पाठीशी होती.तर त्यांच्या प्रतिस्पर्धी व बांगला देश राष्ट्रीय पक्षाच्या अधक्ष्या खलिद झिया !ह्याही कांहीं काळ पं. प. होत्या त्यानी हे 30,टक्के आरक्षण बंद केले होते.म्हणून त्या हसीना शेख ह्यांच्या काळात,तुरुंगात होत्या. परंतु हे आरक्षण पुन्हा सुरू केल्याने,ह्याची ठिणगी पहिली विद्यार्थ्यांवर पडली.येथूनच विरोधाला सुरुवात झाली व त्याचे रुपांतर मग दंगलीत झाले.पंत प्रधान हसीना शेख ह्यांच्या विरोधात वातावरण तप्त झाले.त्यांना पदच्युत करण्याचा डाव सैन्य अधिकारांच्या मार्फत,त्यांना हाताशी घेऊन करण्यात आला.मोठं बंड पुकारण्यात आल!सगळीकडे जाळ पोळं लुटालूट सुरू झाली.सेना प्रंमुखानी सहकार्य करणे म्हणजेच ही एक सत्तापालट करण्याची चाल आहे.त्यामधे हसीना शेख फसल्या व शेवटी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला.शेवटी लष्कराकडून त्यांना आपला देश सोडण्याचा फतवा निघाला. त्यांच्या निवासस्थानी दंगलखोर घुसले.मोठ्या प्रमाणात नासधूस केली,त्यांचे कपडेही घालीत, विभत्स कृत्य लोकांनी केलेलं आहे. त्या जर तावडीत सापडल्या अस्त्या तर त्यांचे तुकडे तुकडे लोकांनी केले असते,हे निश्चित. इतकी धोकादायक परिस्थिती तेथे निर्माण झालेली आहे.ह्यामध्ये निर्दोष व भाबडी जनता मारली जात आहे.त्यांची संपत्ती लुटालूट जाळपोळ करीत आहेत,हे कितपत योग्य आहे. म्हणजे भारतीय सैन्याने व लोकांनी ह्या राष्ट्राला स्वातंत्र्य काय असते ते दाखवलं, त्यांच्या विरोधात आज हे उभे ठाकले.हे कितपत योग्य आहे..शेवटी काय तर “o”आहे. हा प्रकार गंभीर आहे. भारताने ह्यावर सारासार विचार करावा?तेथील भारतीय लोकांची धार्मिक स्थळे जाळपोळ करून अध्वस्थ करीत आहेत.तसेच मुस्लिम धर्मीय हिंदूंचे मंदिराचे रक्षण करताना दिसतात तसेच मशिदितून ही मंदिराचे रक्षा करण्याचे संदेश देण्यात येत आहेत.त्या राष्ट्राच्या जनतेकडून ही परतफेड होत आहे.हे निश्चितच भारताने ह्यामध्ये हस्तक्षेप करावा,वेळ पडल्यास लष्करी कारवाई करावी.पण दंगली घडवून कत्तली करणाऱ्या समाज कांटकाना सोडू नये.ही भारतीय जनतेची हाक आहे.हे किती विदारक चित्र आहे.कारण माझी पंत प्रधान हसीना शेख ह्या भारतीयांच्या आश्रयाला आलेल्या आहेत.कारण भारत म्हणजे आ ओ जाओ घर तुम्हारा! सध्या लाडकी बहीण योजना सुरूच आहे.म्हणून त्यांना येथे सुरक्षित वाटत आहे.तर विरोधक खलिद झिया ह्यांची सुटकाही झालेली आहे.कदाचित येथे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस ह्यांना पंत प्रधान होण्याची संधी आहे.
वरील राजकीय क्रांतीत, भारताचा निर्णय हा महत्वाचा आहे.सर्व भार हा भारतावर पडणार आहे.हे जनतेलाही माहीत आहे.त्यामधे भारतीयांवर होणारे हल्ले हे गंभीर स्वरूपाचे आहेत.त्यामुळे भारतीय पंत प्रधान व त्यांच्या मंत्री मंडळाने,योग्य तो निर्णय घ्यावा?कारण भारताने आपले सर्वस्व अर्पण करून हे राष्ट्र निर्माण केलेले आहे.