
FILE PHOTO
प्रतिनिधी :मिलन शहा
आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान शेख हसीना यांचे साम्राज्य कोसळले. आणि त्या देश सोडून कुठल्यातरी अनोळखी ठिकाणी गेल्याची माहिती आहे.पंतप्रधानांचे निवासस्थान सध्या आंदोलकांनी व्यापले आहे.लष्कराने अद्याप सरकार ताब्यात घेण्याची घोषणा केलेली नाही.ढाक्याच्या रस्त्यावर फक्त लोक आहेत अराजकता शिगेला पोहोचली आहे.भारत सरकार सावध आहे. सीमा सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे . शेख हसीना कुठे आहेत याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.पण शेख हसीना यांच्या लाजिरवाण्या जाण्याने प्रदीर्घ आंदोलन मात्र थांबलेले नाही.