
फोटो :जलकामे खात्याचे अधिकारी रवींद्र मौर्या व इतर अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते रईस शेख व इतर.
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,मालाड,मालवणीतील जल सम्सयेचा समाधान.उप जल खाते अभियंताचे नागरिकां कडून सत्कार. मालवणीतील गेट क्रमांक 7,नवीन कलेक्टर कंपाऊंड मधील नागरिकांना कमी दाब तसेच घाण पाणी आणि मुबलक पाणी मिळत नसल्या मुळे अनेक तक्रारी नागरिकांनी पालिकेच्या पी उत्तर विभागातील जलकामे खात्यात तक्रार केल्या होत्या तसेच संतप्त नागरिकांनी मोर्चा ही काढला होता. मात्र पी उत्तर विभागीय जल कामे खात्यातील उप अभियंता रवींद्र मौर्या आणि इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्यावर काम करत नवीन कलेक्टर कंपाऊंड मधील नागरिकांच्या पाणी समस्यावर समाधान करून दिल्या नंतर नागरिक आनंदी होत सुटकेचा निश्वास घेतला व रवींद्र मौर्या व त्यांच्या खात्यातील इतर नागरिकांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी अब्राहम थॉमस, समसु शेख, रईस शेख सफीना कौसर तिरमल् मिंटू मुक्का भाई,जमील, फरीद भाई रशीद भाई आदी उपस्थित होते तसेच नागरिकांच्या वतीने अधिकाऱ्यांचे आभार मानले.