
खासदार गोपाळ शेट्टी.
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,आंतरराष्ट्रीय तसेच देशभरात पिकलबॉल हा खेळ, लोक खूप उत्साहाने खेळत असून गोरेगांव येथील नेस्को सेंटर येथे जवळ जवळ तीन कार्यक्रमाचे उदघाटन व बक्षीस समारभांस खा. शेट्टी उपस्थित असताना हा खेळ तरुण, मध्यम वर्ग व ज्येष्ठ नागरिक देखील खेळत असल्याचे खा.गोपाळ शेट्टीने पाहिले.
यानंतर दिनांक 29 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय पिकलबॉल संघटन चे अध्यक्ष श्री अरविंद प्रभू यांनी खा.गोपाळ शेट्टी यांना एक पत्र देऊन विनंती केली आहे की, मुंबई महापालिकेच्या आणि खाजगी भूखंडांवर अशा खेळाला परवानगी दिल्यास खूप मोठ्या प्रमाणात लोक या खेळाचा लाभ घेतील आणि विशेष करून तरुणांना हा खेळ खूप लाभदायक आहे.
या पत्राचा संदर्भ घेत खा. गोपाळ शेट्टी यांनी ३० सप्टेंबर रोजी मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून पिकलबॉल खेळ साठी ही मागणी केली आहे की,
“या खेळाचे आयोजन कमी जागा व कमी खर्चात होत असून हा खेळ शारीरिक फिटनेस राखण्यास खूप लाभदायक आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे आणि हा खेळ पाहिल्यानंतर आपणांस हि त्याची नक्कीच जाणीव होईल. नेस्को सारख्या कमर्शिअल जागेत या खेळाचे आयोजन होत असल्यामुळे सामान्य घरपरिवारातले लोक या खेळात सहभागी होऊ शकत नाहीत आणि म्हणून
माझी आपणांस विनंती आहे विशेष करून मोठं-मोठ्या फ्लायओव्हर ब्रिज खाली खूप जागा रिकाम्या पडलेल्या असतात. भंगार गोळा करणारे, व इतर बेवारस लोक जागेचा दुरुपयोग करीत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना याचा त्रास होत असतो आणि हा त्रास दूर करण्यासाठी व खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व फ्लायओव्हर ब्रिज खाली पिकलबॉल खेळण्यासाठी विशेष परवानगी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आपण संबंधित उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना आदेशित करावे”
खासदार शेट्टी यांच्या या पत्राने पिकलबॉल खेळाडूसाठी नक्कीच काही मार्ग निघेल अशी आशा खेळाडूंना मिळाली आहे.