प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

मुंबई,समाज हा केवळ नैतिक मुल्यांच्या आधारावरच टिकुन आहे . सामाजिक बांधिलकी जपणारी अनेक माणसं जेव्हा या समाजाच्या उत्कर्षासाठी धडपडतात तेव्हा कुठे एक निकोप समाज आकार घेत असतो. अश्या लोकांचे कार्य हे इतरांना प्रेरक ठरते…आणि सामाजिक दायित्वाचा हा कारवा अखंड चालत राहतो. म्हणुनच अश्या व्यक्तीमत्वांचा गौरव करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.म्हणून जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक/संचालक अमोल भालेराव,संचालक सुरज भालेराव,कार्यकारी संपादक पंकज हेलोडे यांच्या तर्फे वर्धापनदिनानिमित्त मुंबईत भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ,विविध क्षेत्रात आपलं नाव,देशाचे नाव उज्ज्वल करणारे,समाजाला प्रगतीपथावर नेणाऱ्या आशा अनेक जागृत जनांचा सन्मान, सत्कार जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे करण्यात येतो..गेल्या वर्षी मुंबईत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.याही वर्षी जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे..28 मे सायंकाळी 5:30 ते 9 वर्सोवा ,यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील प्रतिष्ठित ठिकाण समजले जाणारे CWC कॉलेज येथे हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा यांच्या हस्ते…. मा. श्री. गोपाळ शेट्टी (खासदार – संसद रत्न ), मा. श्री. रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री – राष्ट्रीय अध्यक्ष आर. पी. आय.), मा. श्री. अस्लम शेख (माजी मंत्री – आमदार ),मा. श्री. अजय कौल सर (शिक्षण महर्षी – अध्यक्ष – एकता मंच), मा. श्री. प्रशांत काशीद सर (उपाध्यक्ष – एकता मंच ), मा. श्री. शंकरराव “तात्या” बोरकर (उद्योजक ), मा श्री निलेश भगवान सांभरे (संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ), मा. श्री. विनोद शेलार- (भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते ), मा. सौं. संगीता संजय सुतार (मा. प्रभाग समिती अध्यक्षा, मा. नगरसेविका ), मा. श्री.वीरेंद्र चौधरी (माजी नगरसेवक ), मा. श्री….. (प्रसिद्ध कलाकार ), मा. श्री. गणेश गंगाधरण ( वरिष्ठ फिम्स साउंड डिझायनर, साऊंड ), मा श्री. देवेंद्र “बाळा” आंबेरकर (समन्वयक वर्सोवा विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे ), मा. श्री. संजय मानाजी कदम ( विधान सभा, संघटक जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ), मा श्री. सुनील जैन खाबिया ( विधान सभा समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मा. श्री. अल्ताफ पेवेकर ( विभाग प्रमुख शिवसेना ) संपन्न होणार आहे..
समाजसेवक आणि पत्रकार म्हणून आपल्या सर्वांचे परिचित निसार अली गेली अनेक वर्षे आपल्या पत्रकारिते मधून नागरिकांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडत त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.वेगवेगळ्या विषयांवर शोध पत्रकारिता करत निर्भीडपणे आपली जबाबदारी पार पाडली असून त्यांना या अगोदर सुध्दा..2022 रोजी मुंबईत पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थित झालेल्या जागृत महाराष्ट्र राज्य स्तरिय पुरस्कार सोहळ्यात शोध पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला होता तसेच त्यांना उत्कृष्ट समाज सेवक, राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार टी.व्ही.9-शाखा-9, असे अनेक पूरस्काराने सन्मानित केलेले आहे.
