
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,महाराष्ट्रातील पुणे हा विभाग शैक्षणिक, सांस्कृतिक ठिकाण आहे.येथे आळंदी,देहू सारखी संतांची भूमी आहे.तर ह्या संतांची मांदियाळी पुढे नेण्यासाठी,वारकरी पंथ हा सज्ज असतो.हे सगळे वारकरी,आषाढी एकादशी निमित्ताने,पांडुरंगाची पंढरपूर वारी करतात.त्यासाठी हे वारकरी संतांच्या प्रेरणेने,अतिशय भाऊ होतात व आपापल्या पालख्या जोशात पुढे रेटत असतात. अशावेळी,भेभान होताना, ,शिस्तीचे पालन कळतनकळत होत.ह्याचा अर्थ,ते वारकरी मुद्दाम शिस्त तोडतात,असा होत नाही.असच काहीसं घडलंय, ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या प्रस्ताना दरम्यान!काही वारकरी टाळ मृदुंगाच्या नादात काहीसे इकडे तिकडे झाले. अश्यावेळी,उपस्थित पोलिसांनी ताबडतोब लाठीहल्ला केला.अरेरे! काय हा प्रकोप,हे वारकरी गुन्हेगार आहेत,खूनी आहेत का,दहशतवादी आहेत की आतंकवादी आहेत.हे काय चाललंय!बी जे पी आणि शिंदे शहीच्या राज्यात.आज देवाच्या भेटायला जाणेही गुन्हा आहे.तर खरोखरचे गुन्हेगार मात्र रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. हे देवदुत आहेत.त्यांना मारहाण?कुठे राजकीय माणसे हे पांग फेडतील?त्यांना पंढरीच्या माऊलीचे शाप लागणारच.अशा या मोगालयीच्या सरकारचा,महाराष्ट्रातील जनता व वारकरी पंथ निषेध करीत आहे.शेवटी मुख्यमंत्री समेट करतीलच.पण हा समेट,भोंदूगिरीचा असेल!हे जनतेने व वारकरी पंथाने,जाणून घ्यावे.मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर,हे समीकरण आहे.त्यामुळे हा लाठी चार्ज करण्याचा हुकूम कोणी काढला,तेथून ह्या प्रकरणाची सुरुवात व्हावी.तसेच शाषन कडक व्हावे.नाहीतर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत,वारकरी पंथ आपला इंगा दाखवल्या शिवाय गप्प राहणार नाही.