
प्रतिनिधी :उत्कर्ष बोरले
मुंबई: सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेच्या शिकवणूकीचा अंगीकार करत रविवार दि.26 मे रोजी दहिसरमध्ये 186 निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेने उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, घरटन पाडा, दहिसर पूर्व येथे आयोजित या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलन केले.
उल्लेखनीय आहे, की संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबईत सातत्याने रक्तदान शिबिरांची मालिका चालविण्यात येत असून त्याद्वारे उन्हाळ्यात रक्ताची टंचाई दूर करण्यामध्ये फार मोठी मदत मिळत आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे भाईंदर विभागाचे सेक्टर संयोजक हिम्मतभाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अनेक प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राम पोटे आणि सामाजिक कार्यकर्ते रामा विश्वकर्मा यांनी या शिबिराला सदिच्छा भेट देत मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी घनश्याम विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने या शिबिराला यशस्वी करण्यात मोलाचा योगदान दिला.अशी माहिती प्रविण छाब्रायांनी दिली.
