
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,दिलीप अमीन हे बी एस इ एस ली., रिलायन्स, अदानी सारख्या मोठ्या नामांकित कंपनीतून निवृत्त झाले .एक हसरे व्यक्तिमत्त्व आणि दिलखुलास माणूस तथा सगळ्यांना सहकार्य करणारे कर्मचारी. विजीलन्स खात्यात व्यवस्थापक पदावर सेवेला होते.मैदानी खेळाडू म्हणून भरती झालेले,अमीन ह्यांनी आंतर भारतिय वीज कंपन्यांच्या,मैदानी स्पर्धेत त्यामध्ये गोळा फेक,थाळी फेक,भालाफेक,हातोडा फेक आदी क्रीडा प्रकारात, नेहमीच सुवर्ण कामगिरी केली.निवृत्ती नंतर त्यांनी ह्या खेळाचा सराव चालूच ठेवला.वयाच्या साठी नंतरही,ते आंतर आंतरराष्ट्रीय पदक विजेते बनले .नुकत्याच दुबई येथे दि .27 व 28 ऑक्टोबर,2023रोजी,संपन्न झालेल्या मास्टर स्पर्धेत उपरोक्त मैदानी खेळात,त्यानी एक सुवरण,एक रजत,एक कांस्या पदकांची कमाई केली आहे.ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.येथेही आपली चुणूक दाखवली.त्याशिवाय त्यांनी! श्रीलंका,मलेशिया,थायलंड व सिंगापूर येथेही पदकांची लयलूट कलेली आहे व भारताची शान राखली आहे.आणखीन महत्वाच्या स्पर्धेत अजूनही 36हुन अधीक पदके जिंकलेली आहेत.ते एक चांगले कॅरम पट्टू ही आहेत. अजूनही त्यांना आंतरराष्ट्रीय मास्टर स्थरावर,भाग घेऊन भारताचा तिरंगा,साता समुद्रा पलीकडे फडकवायचा आहे!असा त्यांचा “मनसुबा”आहे.त्यासाठी त्यांना येणाऱ्या काळासाठी,तमाम भारतीय जनतेकडून हार्दिक शुभेच्या !