
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,पावसाळा सुरू होऊन मध्यावर आला की, डोंगर दऱ्या, घाट माथा,ज्या ठिकाणी दगड मिश्रित मातीचा डोंगर असेल,त्या ठिकाणी या दरडी कोसळण व भूस्खलन हे प्रकार होत असतात.सध्या हा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. यात कुणाला येणार दोशी धरता येणार नाही. कारण हा कुणाच्या बॉम्ब स्फोटाने, किंवा सुरुंग लाऊन उडवलेला भाग नाही. निसर्गाची ही मानवाला दिलेली आपत्ती आहे. पृथ्वीच्या उत्पत्ती पासून, डोंगर, दऱ्या, घाट माठे उभे आहेत. त्यातून मानवाने रस्ता निर्माण करण्यासाठी,शहरी करण करण्यासाठी, डोंगर दर्या व घाट तोडून काढले,कापून काढले, वृक्षतोड केली, त्यामुळे तेथे पोकळी निर्माण झाली. म्हणून असले आपत्ती जनक प्रकार घडतात. पृथ्वीच्या उत्पत्ती पासून, हे नैसर्गिक नग उभे आहेत. लाखो वर्षांपासून उन,वारा.पाऊस यांचा मारा या नगांनवर्ती,शिखरांनवर्ती होत असतो. त्यामुळे माती वाहून जाते आणि दगड ढिसाळ होतात. मातीचा भक्कम आधार गेल्याने, पावसाच्या जलप्रवाहने,ते अलगद पणे ते खाली पडतात. येताना असलेली दगडे व माती डोंगरावरील वनसंपत्ती सकट, जे मिळेल त्या वस्तू सपाटावर आणून अथवा जलप्रवाह नेऊन, समाविष्ट करतात. मग या डोंगरांच्या कुशित वसलेली गावच्या गावे वाहून जातात. ती या ढिगार्या खाली, अथवा चिखला खाली गाढली जातात. त्यामुळे दोष कोणाल देता येत नाही?हा दैवयोग आहे,अथवा काळ योग आहे. हा प्रकार जर रात्रीच्या वेळी घडला, तर मनुष्य हानी आणि संपत्ती हानी मोठ्या प्रमाणात होते. असाच प्रकार काही वर्षा पूर्वी.पुणे परीसरातील, माळीन ह्या गावी घडला.रात्रीच्या रात्री जोरदार पावसाच्या तडाख्याने, अखंड डोंगर पिठासारखा खाली ओघळला.रात्रीची वेळ असल्याने, साखर झोपेतच संपूर्ण गाव,येथे चिखलात गाढले गेले.सकाळी एसटी चालक,जेव्हा वाहन घेऊन त्या गावाकडे आला तर थांबा तेथे नव्हता, गावही नव्हते, गावांवरील डोंगरही सपाट होऊन, खाली उतरला होता. चालक ही घाबरला! समोर चिखलच चिखल झालेला.कालच येथे वस्ती होती गाव व डोंगर होता,सगळं भुईसपाट झालेल. त्याच वाहन चालकाने मग अनेक ठिकाणी दूरध्वनी करून ही बाब कळवली, त्यामुळे सगळ्या यंत्रणा सुरु झाल्या.ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवता आले. त्या वाहन चालकाला मनापासून सलाम!असेच जागरूक नागरिकच हवेत. आताच ताज उरण देता येईल, रायगड जिल्ह्यातील खालापूर भागातील इरसाळ वाडी परिसर, रात्री या गावा वर असणाऱ्या डोंगराळ भागातील दरड कोसळल्याने, अनेक लोक या ठिकाणी ढिगार्या खाली, गाढले गेले आहेत. सरकारी यंत्रणा कामाला लागलेली आहे.बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या नैसर्गिक आपत्तीत दोष कुणाचा नाही! पावसाच्या मोठ्या जलावहात भारतातील उतरेकडील देवभूमी ! असणारी, उत्तराखंडात ही आपत्ती नेहमीच ढगफुटीने होत असते.संपूर्ण रस्ते हे जलमय होऊन वाहून जात असतात,कारण त्या जल मार्गाला इतका जोर असतो की पर्वता सकट ही जलधारा, वाटेत असेल ते तुडवत शेवटी! हा जलप्रवाह, नदीपात्रात मलवा वाहून नेतो. त्यामुळे चारधाम यात्रा आता अतिशय धोकादायक बनलेली आहे. हा देवाचा प्रकोप नसून, हा निसर्गाचा कोप आहे!महाराष्ट्रातील, डोंगर भागात अशा पद्धतीचे बचाव कार्य हे सरकार आपल्या परीने करत असते, पण दुर्गम भागात बचाव कार्य हे पोहोचायला, जरा कठीण काम आहे. तरी आमचे जवानांचे राहत कार्य हे वाखाखण्या सारखे आहे.पावसा पाण्यात चिखलात आपला जीव धोक्यात घालून,हे काम बचाव गट करीत असतात. तफावत हीच आहे की, आपल्या राज्याचा परिसर मोठा आहे, तर बचाव मनुष्यबळ हे कमी आहे. म्हणून आता सरकारने, आपत्ती पथकांचे नवनवीन संच तयार करायला हवेत,त्याप्रमाणे पोलीस खात आहे, अग्निशमन दल आहे, होमगार्ड आहे, नागरिक संरक्षण दला सारखी यंत्रणा ही तत्पर ठेवायला हवी. त्यांच्या भरतीचा निकाल हा पोलीस भरती प्रमाणे शारीरिक क्षमते नुसार असावा. जेणेकरून एक चांगला नैसर्गिक आपत्ती बचाव गट तयार राहील! सरकारनेही त्यांच्यासाठी अनेक सुविधा व साधने आर्थिक धोरण, वैद्यकीय सेवा, आदींची सोय व
त्यांचा विमा चांगला रकमेचा उतरावा. कारण आपल्या जीवावर खेळून,ते लोकांना बचावाच काम करत असतात. याची नोंद सरकारने व जनतेनेही घ्यावी.या संचान साठी, उदारमतवादी राहावे. शेवटी सांगायचे काय,ही नैसर्गिक आपत्ती आहे.ती कधी घात करेल ते सांगता येत नाही. अशावेळी जनतेने व बचाव कार्य करणाऱ्या दलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.हे संघ तालुका व जिल्हा जिल्ह्यात आणीबाणी साठी तयार असावेत.जेणेकरून ज्या ठिकाणी आवश्यकता असल्यास, त्वरित दल कमी वेळात त्या ठिकाणी पोहोचावा. हा एकच उद्देश! जीवित हानी,संपत्ती हानी आणि पर्यावरणाची हानी ही कमी व्हावी. ज्याप्रमाणे, डोंगराला लागलेला वनवा! हा आटोक्यात आणण्यासाठी किती कष्ट करावे लागतात,त्याप्रमाणे हवा,पाणी आणि आग ह्या सगळ्या प्रलयित गोष्टी, आटोक्या बाहेरच्या आहेत. त्याच्याशी झुंजणे हाच आपल्याकडे पर्याय आहे.