
प्रतिनिधी :कांचन जांबोटी
मुंबई,डॉ.मयुरी शिंदे आणि प्रोफेसर संतोष शिंदे हे दोघेही वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. दोघांचाही भायखळा आणि दक्षिण मुंबईत दांडगा जनसंपर्क आहे. निस्वार्थ चोवीस तास लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. दोघेही सुशिक्षित असून त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानादेखील लोकसेवेसाठी सदैव तत्पर आहेत. जनतेच्या समस्यांची जाणीव असलेल्या आणि आपल्या विभागातील समस्या ज्ञात असलेल्या या लोकसेवकांना एकदा राजकीय संधी देऊन आपले प्रतिनिधित्व करण्यास दिल्यास आपली परिस्थिती नक्कीच बदलेल. गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, गुन्हेगारी प्रवृत्ती, कर्ज, अस्वच्छता या सर्व समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी यांच्या सुशिक्षित आणि सुजाण नेतृत्वाची गरज आहे. राजकारणातून आपली पोळी भाजून घेणाऱ्या लोकांकडे प्रतिनिधित्व दिल्यास महाराष्ट्रासारखी परिस्थिती आपल्या भायखळ्यातही येऊ शकते. तेव्हा आपल्या आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून भायखळा मुंबईत अव्वल बनवण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूया. विचार करा, कृती करा आणि बदल घडवा. आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.