डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारा स्टेटस ठेवला – आरोपीवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल

Share

विशेष प्रतिनिधी :संजय बोर्डे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बदनामी कारक मजकूर समाज माध्यमावर प्रसारित करून व्हाट्स अप ग्रुपवर स्टेटस ठेवणारा आरोपी अमृत पाटील याच्यावर उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनला ऍट्रॉसिटी कलम 3 (1) (v) भादवी कलम 505, 295 (अ ) अन्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबतची हकीकत अशी की ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील नरेनगाव येथील अमृत पाटील या इसमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील बदनामीकारक व अपमानित करणारा मजकूर समाज माध्यमावर प्रसारित करून स्वतःच्या व्हाट्स अप वर स्टेट्स ठेवले, हा मजकूर सुदर्शन गायकवाड या सामाजिक कार्यकर्त्याने बघितला त्याने त्वरित आपल्या ग्रुमधील सभासदांना कळविले. त्या नुसार मलंगगड परिसरातील 45 गावांची भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोईर व आर. पी. आय (अ ) ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढेरे यांच्याशी चर्चा करून गैर अनुसूचित जातीचा इसम अमृत पाटील याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा अर्थात ऍट्रॉसिटी कलम 3 (1) (v) भादवी कलम 505, 295 ( अ ) अन्वये गुन्हा दाखल केला.
यावेळी ऍड. जय गायकवाड, सुदर्शन गायकवाड, डॉ डी जे मानकर, धनंजय सुर्वे, सागर भोईर, संतोष गवळी, संदीप उबाळे, आशा सोनावणे, जया तेजी यांच्यासह वंचित बहुजन आधाडी, आर. पी. आय, बसपा सह सर्व आबेडकरी पक्ष संघटनेचे कार्येकर्ते, भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *