
file फोटो
प्रतिनिधी :मिलन शहा
अमेरिका :फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवर AK -47 ने गोळीबार झाल्याचे वृत्त आहे, मात्र ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. ट्रम्प यांच्या सहकार्यन्नी ही माहिती दिली. कॅम्पेन कम्युनिकेशन डायरेक्टर स्टीव्हन चेउंग यांनी माहिती दिली की ट्रम्प सुरक्षित आहेत.
या आदी दोन महिन्यांपूर्वी, दिनांक 13 जुलै रोजी,पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना एका शूटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता, त्यावेळी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली आणि ते गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी काही वेळातच गोळीबार करणाऱ्याला शोधून काढले आणि त्याला ठार मारले होते.