
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई:मुंबईतील गजबजलेल्या लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवार दि. 6 सप्टेंबर रोजी,सकाळी आग लागली.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
आगीची माहिती मिळताच पोलिसांचा पथक ही घटनास्थळी दाखल झाला आहे. टाइम्स टॉवर इमारतीला आग लागल्याच्या बातमीला मुंबई महानगरपालिकेने दुजोरा दिला आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.