
File Photo
प्रतिनधी:सुरेश बोरले
बॉलिवूड मधील जेष्ठ कलाकारां मधील जुन्या जमान्यातील सोज्वळ अभिनेत्री,सुलोचना दीदी ह्यांचे,प्रदीर्घ आजाराने,दादर येथील सुश्रुषा इस्पितळात दिनांक.4मे 2023रोजी
उपचार घेत असताना,94 व्या वर्षी निधन झाले.स्वर्गीय, सुलोचना दीदी, पूर्वश्रमीच्या, सुलोचना लाटकर. यांचा जन्म 30 जुलै 1928 ला खडकपाल चिकोडी कर्नाटक येथे झाला. हा परिसरात बेळगाव जिल्ह्यात येतो. 1943 ल त्यांनी प्रथम मराठी चित्रपटात, आपल्या कामाला सुरुवात केली जवळ जवळ 50 चित्रपटात त्यांनी मुख्य नटीचे कामे केली.तसेच चरित्र अभिनेतरी करताना त्यांची लोकप्रियता इतकी वाढली. त्यांना हिंदी सिनेमासाठी ही बोलावलं आलं व जवळ जवळ त्यांनी 250 हिंदी चित्रपटामध्ये कामे केलेली आहेत,त्यामध्ये सहायक कलाकार,चरित्र अभिनेत्री त्यांनी साकारल्या. त्यांना त्याकाळच्या निर्माता व दिग्दर्शक स्वर्गीय, भालजी पेंढारकर यांचा मार्गदर्शन लाभलं. एक सौज्वल स्वभावाच्या,प्रेमळ व अतिशय भावुक अशा त्या होत्या.तसेच त्यांनी,तशाच प्रकारच्या भूमिका चित्रपटात साकारल्या. एक दुखी आई, काकी, अशा भूमिकांत सगळ्यांना सांभाळून घेणारी कौटुंबिक व्यक्तीअशी त्यांची ख्याती होती. तर हिंदी चित्रपटही त्यांनी एक त्यावेळच्या नामांकित नट व अभिनेत्रीन बरोबर चरित्र कलाकार ,
म्हणून अतिशय चांगल्या भूमिका त्यांनी निभावलेल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. एकंदरीत त्याने 400 हून अधिक चित्रपटात कामे त्यांनी केलेली आहेत. त्यांनी केलेल्या या चित्रपट प्रदीर्घ सेवेला आमचा सलाम!