
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, भारिप बहुजन महासंघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्या, मालाड (पु) कुरार व्हिलेज येथील झुंजार व्यक्तिमत्व मैनाताई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून मृत्यूसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या. मैनाताई गायकवाड यांनी अनेक आंदोलनात अग्रणी सहभाग घेतला होता. बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. आंबेडकरी चळवळीशी समर्पित जीवन त्या जगल्या. कुरार व्हिलेज मधील सर्व कार्यक्रमाला त्यांचे मोलाचे योगदान असायचे. त्यांचा सर्वच आंबेडकरी राजकीय पक्षांशी तसेच संघटनांशी जवळचा संबंध होता. त्यांच्या जाण्याने एक चळवळीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची प्रतिक्रया बौद्ध समाजातून व्यक्त केले जात आहे. मैनाताई गायकवाड यांना पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.