
कवी :डी.पी.एस.बी सागर
करू नकोस प्रेम आपल्यात कात आहे
बघ ना तुझी – माझी वेगळीच जात आहे .
गरिबास पाहून डोळ्यात अश्रू येत नाही ,
बघ तुझ्या-माझ्या नात्याचा रंग जात आहे.
जाता येता बघतात ते गोरी पाठ तुझी
बघ खुलेआम तुझी अब्रू जात आहे.
नकार दिल्यास तुझा छळ करेन म्हणतो,
बघ तो माणसातून जनावरात जात आहे.
जाग नारी तू सावित्री हो रणरागिणी हो ,
बघ ही माणसे तुला छळण्यास जात आहे.
रडू नको रे तू चिराग हो संविधाना !
बघ तुला जाळण्यास ते जात आहे.
तुझी जात माझी जात म्हणता म्हणता ,
बघ भारतीय असल्यास पुरावा जात आहे.
©️®️ डी.पी.एस.बी सागर
( जातीमुळे ती मातीत गेली )
+91 78430 82305
____________________________________
नातं तुझं माझं जणू
आभाळ माझ्या सोबतीला
नातं तुझं माझं जणू
गगन आलं माझ्या भेटीला
नातं तुझं माझं जणू
पाण्यात पडलेलं स्व:ताचं प्रतिबिंब
नातं तुझं माझं जणू
नाव नसलेलं स्व:ताचं अस्तित्व
नातं तुझं माझं
देठाला उमलू लागलेलं ते कोवळं फुलं
नातं तुझं माझं
चुलीवर बसलेलं ते हागरं मुलं
नातं तुझं माझं
एकमेकांत गुंतलेलं, कुणीही नं पाहिलेलं, कुणीही नं अनुभवलेलं
नातं तुझं माझं
पहिल्या धारेचं दुध प्यायलेलं
नातं तुझं माझं तुच सांग कशासारखं,
सशासारखं, की माश्यासारखं…
की त्याहीपेक्षा वेगळं
एकाच धाग्यात ओवलेलं
नातं तुझं माझं मी पाहिलेलं
आणि तु अनुभवलेलं…
संतोष अशोक शिंपी
7045845701
9987149549 वर whatts ap करा