
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई, चुना भट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 18ऑक्टोबर रोजी, तक्रारदार इब्राहिम सेट बिल्डिंगच्या पॅसेज मध्ये गुलजार हॉटेल च्या पाठीमागे कुरेश नगर कुर्ला या ठिकाणी दुधाची डिलिव्हरी करत असताना आरोपी आवेश खान उर्फ आवेश बरेली व त्याचे साथीदार यांनी आपसात संगणमत करून चाकू व वस्त्रयाचा धाक तक्रार दाराला दाखवून त्याच्या खिशातील रोख ₹48हजार जबरीने चोरी केले म्हणून चुनाभट्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यातील आरोपी त्याचा वापरता मोबाईल क्रमांक सातत्याने बदलत होता त्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड झाले होते आरोपीत सध्या वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती प्राप्त करून त्याचा सीडीआर प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता नमूद आरोपीत सध्या माहीम कोळीवाडा परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली दोन दिवस सातत्याने आरोपीचा शोध घेऊन आज दिनांक 24ऑक्टोबर रोजी, रात्री 12वाजताच्या सुमारास माहीम येथून त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे यातील पाहिजे आरोपींची नावे निष्पन्न केली असून त्याचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल देसाई चुनाभट्टी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सपोनि सचिन सरडे, सपोनि प्रदीप पाटील पोहवा 30203/घाडगे, पो.नायक 060645/ साळुंखे,पोशिपाई 0903497/माने,पोहवा 971029/राणे (पो.उप आयुक्त कार्यालय) यांनी अहोरात्र मेहनत घेत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली