प्रतिनिधी :मिलन शहा
छत्तीसगडच्या सर्व दहाच्या दहा महानगरपालिकांमध्ये कमळ फुलले, काँग्रेसचा सफाया….
छत्तीसगडच्या नागरी संस्था निवडणुकीत भाजपने आपला झेंडा फडकवला आहे.पक्षाने सर्व 10 महानगरपालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
रायपूर महानगरपालिकेत मीनल चौबे यांचा सर्वात मोठा विजय आहे.
मीनल चौबे यांनी दीप्ती दुबे यांचा 1 लाख 53 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
रायपूरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
रायपूरमध्ये 15वर्षे काँग्रेसचा महापौर होता.याशिवाय, दुर्ग, राजनांदगाव, बिलासपूर, जगदलपूर, अंबिकापूर, रायगड, चिरमिरी या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे.