चंद्रयान झेपावे!आणि जनतेने, रस्त्यावरचे खड्डे सोसावे!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

file photo

भाताचे चंद्रयान-3 चंद्रावर अलगत उतरले.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.पण काल पनवेल येथे एका राजकीय व्यक्तीची सभा होत,त्यांनी एक चांगले विधान केलेल आहे.ते पटण्या सारखे आहे.कारण एक म्हण आहे,मोठ्या घराचा पोकळ वासा!आज प्रगतिशिल भारताला,आंतरिक मजबुतीची आवश्यकता आहे,यान उडवणे ही कामे,प्रगत राष्ट्राची कामे आहेत.नेत्यांनी सांगितले!यान उडवता,त्याचा काय उपयोग?हे खरे आहे.असे जनतेला वाटते.कारण भारतात,इतकी बेकारी व गरिबी आहे त्याच काय?हा वायफळ खर्च आहे.यांनाच उडवायची असतील तर?महाराष्ट्राचा रस्त्यावरच उडवा?कारण वरही खड्डेच पहायचे आहेत.त्याच्या पेक्षा चांगले खड्डे ,आमच्या रस्त्यावर आहेत.त्याचे फोटो घ्या!कारण अमाप पैसा खर्चून जर का रस्ते दुरुस्त होत नसतील,तर उपयोग काय?हे खर आहे.महाराष्ट्रात रस्त्यांची दुर्दशा आहे.कोकणचे घ्या ना!2007 साली रस्त्याचे काम सुरू केले,ते 2023 साल आले आहे पण रस्ता काय होत नाही?ह्या रस्त्या साठी जवळ जवळ 15हजार कोटीहून अधिक खर्च झालेला आहे.हे दुर्दैवच म्हणावे लागेल.हे पैसे कोणाचे?लोकांचेच ना?मग गेले कुठे?जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्या कडे कंटेनर आहेत. ह्या रस्त्या संबंधी ,त्या नेत्यांनी नितीन गडकरींनी संपर्क साधला व हकीकत सांगितली!गडकरी म्हणाले,मी प्रयत्न केला पण, कंत्राट दारांकडून सहकार्य मिळाले नाही,ते पळून गेले व न्यायालयात गेले.विधान सभेत एकही माणूस ह्या विरुद्ध आवाज उठवत नाही.हे दुर्दैव आहे!मग पुन्हा नवीन टेंडर,पुन्हा नवीन वाढीव मलिदा खायचा?अशी वर्षे ह्या रस्त्यासाठी वाया गेली.रस्ता आहे तेथेच आहे?मग पैसे जातात कुठे?हे जनतेने ठरवावे?आशाच लोकांना आपण पुन्हा निवडून द्यावे.हे जनतेला समजत नाही?हेच मोठ दुःख आहे. अशांना जनतेने धडा शिकवावा असे नेते म्हणाले?शेवटी सांगायचे काय तर राष्ट्राची पायाभरणी मह्त्वाची आहे.बेकार सुशिक्षित तरुणांना हाताला काम मिळेल तर उद्या,राष्ट्राला चांगले शास्त्रज्ञ मिळतील,देशाला आर्थिक सुबत्ता मिळेल,मग तुम्ही चंद्रावर काय?सूर्यावर यान उडवा?येथे भारतीय एस्त्रो या संस्थेचे हार्दिक अभिनंदन आहेच! कारण त्यांनी आपले यान चंद्राच्या दक्षिण टोकाला उत्रवल आहे.जी चंद्राची मागील बाजू आहे.हा एक विक्रमच आहे.कारण तेथे बर्फ असून पाण्याची शक्यता आहे.ह्या ठिकाणी कोणत्याही राष्ट्राने अजूनपर्यंत यान उतरवलेले नाही? भारताने अवकाशात मोठी प्रगती केली आहे. पंतप्रधानांनी आता शुक्र ग्रहा नंतर सूर्य मोहिम आखली आहे.तत्पूर्वी त्यांनी,आमच्या महाराष्ट्राच्या रस्त्यांवर यान उतरवावे, ही जनतेची विनंती आहे.


Share

One thought on “चंद्रयान झेपावे!आणि जनतेने, रस्त्यावरचे खड्डे सोसावे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *