
photo courtesy :DD maha vidhansabha
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
कामगार एकता युनियन च्या माध्यमातून घरेलू कामगार, नाका मजदूर आणि बांधकाम मजूर इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांसोबत मुंबई उपनगर क्षेत्रात कार्यरत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने घरेलू कामगारांच्या संदर्भात आमदार ऋतुजा ताई रमेश लटके यांची भेट घेऊन निवेदन दिले होते, त्या निवेदनात घरेलू कामगारांच्या प्रश्नासंदर्भात काही मागण्या अधोरेखित केल्या होत्या आणि त्या बाबत हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा ही विनंती संघटनेने केली होती.
ऋतुजा ताईन्नी कामगार एकता युनियन च्या विनंतीला मान देवून घरेलू कामगारांचा प्रश्न अधिवेशनमध्ये विधानसभेत अतिशय प्रभावीपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आणि त्यावर शासनाने विचार करावा ही भुमिका घेतली त्याबद्दल सर्व घरेलू कामगार आणि कामगार एकता युनियन व घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत , ताईंचे धन्यवाद देत कौतुक केले आहे.
आपल्या या भूमिकेमुळे आणि घरेलू कामगारांचा मुद्दा अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे विधानसभेत मांडल्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
भविष्यात ही आपण असंघटित क्षेत्रातील कष्टकरी, कामगारांचे मुद्दे एक प्रभावी व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्ह्णून विधानसभेत सातत्याने मांडत राहाल हा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपले कामगार एकता युनियन च्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.
सामाजिक कार्यकर्ते अमित.गवळी , मालाड विभाग कामगार एकता घरेलू कामगार प्रतिनिधी वैशाली महाडिक, पंचशीला निकाळजे , वैशाली ठाकूर, विकास वाघमारे , नितेश धावडे यांनी ऋतुजा ताईंचे अभिनंदन केले व वारंवार प्रश्न मार्गी लागे पर्यत मुद्दा धरून ठेवावा हीच अपेक्षा व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे.
