
फोटो :आमदार ऋतुजा रमेश लटके यांना निवेदन देताना घरेलू कामगारांचे प्रतिनिधी मंडळ.
अरे कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही.
प्रतिनिधी : पराग बुटाला
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वयक समिती महाराष्ट्रातील विविध राज्यांमधील 45 लाख घरेलू कामगारांना श्रमिक दर्जा मिळावा म्हणून सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावे म्हणून गेल्या काही वर्षापासून अथक लढा देत आहे याच महाराष्ट्र घरेलू कामगार सन्मानित समितीचे प्रतिनिधी व मलाड ,अंधेरी मुंबई मधील कामगार एकता युनियनचे प्रतिनिधी आणि घरेलू कामगार यांनी मिळून आपल्या स्थानिक आमदारांना प्रत्यक्ष भेटून घरेलू कामगारांना त्याचा सन्मान आणि दर्जा तसेच शासकीय सुविधा म्हणजेच सामाजिक सुरक्षा मिळाव्या याकरिता निवेदन देण्यात आले तसेच या निवेदना सोबत जोडले आहे .
1) मुंबई हायकोर्ट ची ऑर्डर दिनांक 18 फेब्रुवारी, 2021
2) किमान वेतन शासन अधिसूचना आणि मा. कामगार मंत्री याचे वेतन संहिता नियम, 2021 लागू करण्याची कार्यवाही सुरु असल्याबाबतची माहिती
3) संघटनेतर्फे तयार करण्यात आलेला कायद्याचा मसुदा
4) महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा, २००८ देण्यात आला आणि त्यांना घरेलू कामगारांच्या मुद्याला घेऊन अधिवेशनामध्ये आपण तारांकित प्रश्न करावं असं त्यांना सांगण्यात आलेला आहे आणि आमदारांकडून ही तसे आश्वासित करण्यात आलेला आहे की नक्कीच प्रयत्न करू तसेच महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाला पत्र देखील पाठवू,
यामध्ये मलाडच्या स्थानिक आमदार असलम शेख यांना मलाडचे प्रतिनिधी व कामगार एकता युनियनचे तसेच महाराष्ट्र समन्वयक समितीचे प्रतिनिधी यांनी मिळून पत्र दिले तसेच अंधेरी के पूर्वच्या आमदार ऋतुजा रमेश लटके यांना देखील प्रत्यक्ष भेटून पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य घरेलूकामगार समन्वयक समितीचे राजू वंजारे ,ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य समितीचे प्रतिनिधी अमित गवळी तसेच कामगार एकता युनियन प्रतिनिधी वैशाली महाडिक, विकास वाघमारे, नितेश धावडे पंचशीला निकाळजे, विजया बाबर, गंगुबाई वावळे, वैशाली ठाकूर ,नीलम शिंदे असे युनियनच्या प्रतिनिधी व घरेलू कामगार या सर्वांच्या संगतमताने हे निवेदन देण्यात आलेले आहे.

फोटो :आमदार अस्लम शेख यांना निवेदन देताना घरेलू कामगार प्रतिनिधी मंडळ.