
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
गोराई-2 व 1 येथे गेले अनेक दिवस अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होते व सतत तक्रार करत होते तसेच त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या कडे ही केली होती. त्यानुसार शेट्टी यांनी पालिकेच्या सहाय्यक अभियंता मांडवकर मॅडम, दुय्यम अभियंता स्मिता मॅडम कनिष्ठ अभियंता भालचंद्र पाटील सर तसेच चंद्रकांत सर यांच्यासोबत जाऊन नमूद संस्थांमध्ये पाहणी केली आणि समस्या समजून घेतली.
पाहणी दौरा च्या वेळी आर. एस. सी. 28 ते आर. एस. सी. 30, 32 व 36 येथील जलवाहिनीला चार ठिकाणी वळणे (बेंड) दिल्यामुळे पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांना होणारा हा नाहक त्रास पाहता शेट्टी यांनी पालिकेचे सहाय्यक अभियंता मिठकरी साहेब, बांधकाम अधिकारी विद्या मॅडम, दुय्यम अभियंता बणगर साहेब तसेच रस्त्याचे कंत्राटदार, जल वहिनी कंत्राटदार व आर/मध्य, पालिका अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच गोराई 2 व 1 येथील इतर संस्थांमध्येही कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पाण्याचा दाब वाढवून पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत झाला नाही तर तीव्र जन-आंदोलन नागरिकांना सोबत घेऊन करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी पालिकेला दिला आहे.
