क्रिकेटपटू सरफराज खानवर चयनकर्त्यांचा अन्याय!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,कॅच देम यंग मॅन! हे ब्रीद वाक्य, युवकांच्या कलागुणांची कदर करण्यासाठीच वाक्य आहे.कारण युवा हे राष्ट्र चालवतात.युवा शक्ती ही मोठी शक्ती आहे. आपणही एका वेळेला ह्या अवस्थेत होतो व आपल्याला आपली काय क्षमता त्यावेळेला माहिती होती. हे आपण जाणतो. अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखवायची धमक व हिम्मत कुणात असते,त्याची कदर होणे व आपल्या देशाचा प्रगती करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे! मग ते कला,क्रीडा,सामाजिक, राजकीय प्रकारात असो! त्याला वाव व चांचू प्रवेश मिळणे आवश्यक आहे. म्हणजे तो आपल्या अंगच्या कलागुणांनी आपली कर्तबगारी दाखवून, तो राष्ट्राचे नाव मोठे करू शकतो.असे गुण त्या युवकांमध्ये असताना,जर का त्या युवकाला जर संधी नाही मिळाली व तर मग तो युवक उदासीनते कडे वळतो,व्यसनाधीन होतो.वाम मर्गिय होतो.असाच कांहीं तरी होतय, ते अतिशय जवळील क्रिकेट स्पर्धेमध्ये.अनेक असे मोहरे आहेत मुंबईचे,जे क्षमता असतानाही, त्यांना भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.तर त्यांच्या कोणी गॉडफादरही नव्हता,म्हणून ते मागे राहिले. त्यामध्ये पद्ममाकर शिवलकर,अमोल मुजुमदार, विनोद कांबळी यांची उदाहरणे देता येईल.नाहीतर अशोक मंकडना, विनू मंकडाचे पुत्र म्हणून भरपूर संधी दिली गेली, पण ते काही चमकले भित. गेले ते दिवस, पण आताही मुंबईच्या, मुंबई संघाचा कणा आहे, तो म्हणजे उदयोनमुख खेळाडू, सरफराज खान, मेहनती व धष्टपुष्ट खेळाडू. त्यांने या मोसमात धावांचा पाऊस पाडला. अतिशय खतरनाक फटकेबाजिने त्याने,पहिल्या वर्गाच्या क्रिकेट सामान्यांत धावांचा रतीब घातला. ही खरी गोष्ट आहे की क्रिकेटमध्ये आता भारी स्पर्धा आहे. कारण जो तो उठतो तो आपल्या मुलाला सचिन तेंडुलकर,विराट कोहली बनवायला पाहत आहे, ठीक आहे. पण जो या अतिशय कठीण स्पर्धेत टिकेल,त्यालाच पुढे जाता येईल यात शंका नाही. या कांहीं कारणास्तव,चांगले खेळाडू आज. भारतीय संघात च्या बाहेर आहेत आता नवीन सुरुवात करीत आहेत. परंतु सध्या जो अगदी तयारीत आहे आणि कसोटीच्या उंबरठ्यावर आहे,अशा सरफराज खानला वगळल हे काही पचत नाही.भारताचे महान खेळाडू ,सुनील गावस्कर यांनी सफराजच्या न निवडीला आश्चर्य व्यक्त केले आहे.चयन समिती वर नाराजी व्यक्त केली आहे. आपण आता सरफराज खानची ताजी आकडेवारी पाहू! रणजी ट्रॉफीत व पहिल्या वर्गाच्या 37 सामान्यांत 3505 धावा . त्यामध्ये 13 शतक,9 अर्ध शतक. प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये सर्फराजची सरासरी 80 आहे.ही कामगिरी त्यांनी गेल्या तीन वर्षात सातत्याने 100 टक्के केलेली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, फक्त सर डॉन ब्रॅडमन यांच्या मागे तो आहे. म्हणजेच अशी कामगिरी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलेली नाही.एक अशी वेळ होती की, त्याने सर डॉन यांनाही टाकले होते. तो जर का इतर राष्ट्रात असता, तर केव्हाच राष्ट्रीय संघात असता. आयपीएलच्या आधारे तुम्हाला खेळाडूंना चयन करायचा असेल, तर मग देशांतर्गत होणारी रणाजी स्पर्धा ही बंद करावी.असे विधान महान खेळाडू सूनील गावसकर ह्यांनी केले आहे. कारण आयपीएल स्पर्धा ही चकाचौंद स्पर्धा आहे. त्या क्रिकेटमध्ये कॉपीबुक असणारे नजाकत भरे फटके पाहण्यापेक्षा, या स्पर्धेत खेळाडू नवीन नवीन फटक्यांक्या मेजवानीत खेळाडू बदल करतात, हे फटके फक्त आयपीएल मध्येच छान वाटतात. असे अनेक खेळाडू हे फटके कसोटीत खेळताना स्वतःच अगदी स्वस्तात बाद होत आहेत.त्यामुळे गावस्करांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर का आपला क्लास टिकवायचा असेल तर आपल्याला क्रिकेटका समर्पितच खेळ कराव लागेल, त्यामध्ये नजाकतता सुंदरता आहे. जी म्हणजे मैदानाची शान आहे. ह्यातील सगळे गुण हे, सरफराज खान मध्ये ठासून भरलेले आहेत. केवळ आयपीएलच्या जोरावर, चयन करणे चुकीच आहे. कारण आयपीएल एक रंगबिरंगी पोशाखांचा मेळावा आहे. तिथे खेळाचा क्लास म्हणजे दर्जा याला किंमत नाही.ही मखमली स्पर्धा आहे. आणि जर का बकवास स्पर्धेचा संदर्भ धरून, चांगल्या खेळाडूचा बळी देत असाल तर ते त्याच्यावर! अन्यायकारक आहे. याची नोंद चयनकर्त्यानी आवश्यक त्याने घ्यावी.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *