कोकण सुपुत्र माजी खासदार हुसेन एम दलवाई(Sr) यांचे निधन..!!

Share

प्रतिनिधी:वैशाली महाडिक

माजी आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार एडव्होकेट हुसेन मिसरी खान दलवाई यांचे दिनांक 16 मे रोजी,मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन..!

मुंबई,हुसैन भाईंचे दि.16 मे रोजी संध्याकाळी मुंबईत सैफी हॉस्पिटल मध्ये दिर्घ आजाराने निधन झाले त्यांचे वय 99 वर्षे होते दलवाई साहेबांनी 1962 ते 1978 असा दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. 1977-78 मध्ये एक वर्ष महाराष्ट्राच कायदामंत्रीपद त्यांनी भूषविले. तद्नंतर मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडे पांच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. हुसेन भाई समाजवादी विचारांचे पाईक होते. मतदार संघात घरोघरी ,गावोगावी जाऊन समस्या जाणून घ्यायचे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यांचा पार्थिव दिनांक 17 मे रोजी रुग्णालयातून 11 वाजता चर्चगेट येतील त्यांच्या घरात नातेवाईक आणि किटुंबियांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे .12 ते 1 .30वाजे पर्यंत MRCC कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते,नेते आणि पदाधिकारी तसेच सामान्यांच्या दर्शनासाठी ठेवणार मग तिथून अंजुमान इस्लाम शाळेत अंतिम दर्शनासाठी नेहणार व तिथून अंतिम यात्रा सुरु होऊन मरीन लाईन्स येथील बडा कबरस्थान येथे दफन विधी पार पडणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी वय 85 वर्ष तसेच 3 मूल मुश्ताक,फिरोज,दिलावर,आणि 2 मुली रेहाना व शहनाझ व नातवंड असा भला मोठा कुटुंब आहे.

ही माहिती राज्य सभेचे माजी खासदार तसेच विधान परिषदेचे सदस्य आणि माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य हुसेन दलवाई(Jr)यांनी दिली आहे.


Share

2 thoughts on “कोकण सुपुत्र माजी खासदार हुसेन एम दलवाई(Sr) यांचे निधन..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *