
File photo
भारतीय चित्रपट सुट्टीचा काळ 1950,1960 1970,1980 पर्यंतचा सुवर्णकाळ होता. पण मग कोणत्याही चित्रपटात, नट, नट्या, संगीत, नाच तसेच गीतकार,संगीतकार असो, सगळ्यांच्या गोष्टी अतिशय मेहनती असायच्या. कारण चित्रीकरण करण्याचा तांत्रिक भाग विकसित नव्हता. कलांतराने छायाचित्रण करण्याच्या तांत्रिक बाबतीत विकास घडला. त्यामुळे सिने जगतावर,त्याचा प्रभाव पडला. चित्रपट निर्मिती वेगाने सुरू झाली. तर त्यामध्ये कामे करणाऱ्यांची एक कडीच तयार झाली. त्यामध्ये अनेक नट,नट्या सहायक कलाकार खलनायक कलाकार, यांची एक मांदीआळीच तयार झाली. सगळ्या कलाकारांचा आपला असा एक वर्ग तयार झाला. त्यामध्ये अनेक घटक तयार झाले. त्यामध्ये खलनायकी करणाऱ्या कलाकारांचा गट तयार झाला. त्यांना फक्त खलनायकीच काम मिळत होती. तर काही खलनायक नट झाले, पण ते बोटांवर मोजण्यात इतकेच. खलनायकांची एक मांदयाळीच तयार झाली.अश्यात 1950 च्या दशकात, एक तगडा खलनायक फिल्मी जगतामध्ये उतरला. अंगावर सूट व बूट काळे, हातमोजेही काळे, डोळ्यावर गॉगल तोही काळा व डोक्यावरची हॅट ही काळी आणि हातात सिगार!असा त्याचा पेहराव होता. मैदानी खेळांचे शरिर असल्याने, देहबोली मजबूत होती, फक्त करडी नजर टाकायची!” खामोश” हा शब्द भूतकारा सारखा वापरून, समोरच्या नटला नामोहरण करायचे.जमल्यास, हातात पिस्तूल घेऊन उभे राहायचे सगळ्यांना आव्हान करायचे,दोन नंबरचा माल विकायचा व आपली दहशत निर्माण करायची. असा भारदस्त खलनायक अर्थातच, स्वर्गीय, के. एन. सिंग
नाव कृष्ण निरंजन सिंग होते. म्हणून त्यांना फिल्मी जगतात के.न.सिंग या नावाने ओळख मिळाली. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1908 रोजी सौंदर्याने नटलेल्या देहरादून येथे झाला. एक पांढरपेशीय खलनायक म्हणून ते प्रसिद्ध होते. 1935 च्या काळात एक चांगले व्यायाम पट्टू व मैदानी खेळाडू होते.भाला फेक व गोळा फेक हा त्यांचा मैदानी आवडता खेळ होता. त्यामध्ये ते मातब्बर ही होते. या खेळात त्यांनी अनेक पदके जिंकली व ते राष्ट्रीय चॅम्पियन होते. 1935 च्या बर्लिन ऑलिंपिक पथक समूहामध्ये त्यांचं नावही समाविष्ट करण्यात आलं होतं.परंतु काही कौटुंबिक कारणास्तव त्यांना ते ऑलिंपिक करता आले नाही. त्यांच्या जीवनात ही मोठी संधी वाया गेली. त्यांचे वडील कै. सि.पी.सिंग देहरादून चे ब्रिटिशांच्या काळातील बॅरिस्टर होते. ते राज घराण्या पैकी होते. ब्रिटिश सरकारने त्यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. कारण आग्रा व अवध हा परिसर त्यांच्या अधिपत्याखाली होता. नंतर ब्रिटिशांनी त्यांच्याकडून हा भाग काढून घेतला. 1936 च्या बर्लिन ऑलिंपिक मध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला असताना, त्यांच्या बहिणीच्या डोळ्याचे ऑपरेशन आले, त्यासाठी त्यांना कलकत्ता येथे जावे लागले. कारण बहिणीचे यजमान त्यावेळेस इंग्लंडला होते. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याच पर्याय नव्हता व त्यांची बर्लिन ऑलिंपिक वारी येथेच संपली. या मोठ्या धक्क्याने त्यांचं खेळातील लक्ष विचलित झाले व ते मैदानापासून बाहेर फेकले गेले. एक देखणं व्यक्तिमत्व! त्यामुळे आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निश्चय घेतला. त्याला अथक प्रयत्न करून 1936 मध्ये “सुनहरा संसार” या चित्रपटात त्यांना पहिले का मिळाले. त्या दिवसापासून हिंदुस्तानी फिल्मी दुनियेत लोकप्रिय कलाकार बनले. नंतर “बागवान”या चित्रपटांना पहिला खलनायक रंगवण्याचा चंचू प्रवेश मिळाला.मग त्याने मागे वळून पाहिले नाही. कालांतराने त्यांची गट्टी हिंदुस्तानी फिल्म जगताचे, शोमन स्वर्गीय,राज कपूर यांच्याशी त्यांची गट्टी जमली. कारण त्यांचे वडील स्वर्गीय, पृथ्वीराज कपूर यांनीच, त्यांच्या सांगण्यावरून के.न. सिंग यांना चित्रपटात काम मिळाले होते. त्यामुळे ते कपूर घराण्याची शेवटपर्यंत संलग्न राहिले. त्याने स्वर्गीय राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायक साकारला. एक बेदरकार खलनायक म्हणून ते वावरले. अनेक भाषा व हिंदी चित्रपट जगतात, त्यांनी एकंदरीत 200 चित्रपटांत कामे केली व त्यामधील 99% ही खलनायकाची कामे होती.त्यांच्या ह्याच कामामुळे ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर राहिले. उतार वयातही, त्यांनी सहायक कलाकार म्हणून अनेक चित्रपट कामे केली. चरित्र अभिनेता म्हणूनही, ते बराच काळ चमकले. ते चांगले दूरचित्रवाणी कलाकार होते 1986 च्या” नुक्कड” या मालिकेतही ते आजोबांच्या रूपात झळकले होते. नंतर ही त्यांनी दूर चित्रवाणीवर त्यांनी अनेक कामे केली. स्वर्गीय,चंद्रावती सिंग यांच्याशी त्यांनी विवाह केला. आपला भावाच्या मुलाला “पुष्कर”यास त्यांनी दत्तक घेतले. ते सुद्धा एक चांगले दिग्दर्शक आहेत. अनेक चित्रपटात त्यांनी खलनायक रंगवताना, त्यांनी आपला बाज कायम ठेवला. नंतरच्या काळातही, एखाद्या कसलेल्या कलाकरा प्रमाणे त्यांनी 1970, 1980 दशकात, अनेक सकस कामे केली. एक एक नामवंत क्रीडापटू ज्यांना 1936 क्या बर्लिन ऑलिंपिक मध्ये भाग घेता आला नाही, म्हणून त्यांनी आपला धीर सोडला नाही. एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकीक कमावलाच.पण एक फिल्मी अभिनेता म्हणूनही त्यांनी प्रसिद्धी कमावली. आपल्या जवळ जवळ 50 वर्षाच्या प्रदीर्घ फिल्मी कारकीर्दीत 200 हून अधिक चित्रपटात कामे करून, लोकांची सेवा केली व शेवटच्या वेळेस त्याची दृष्टीही गेली होती. 31 जानेवारी 2000 रोजी त्यांचे मुंबईत देहावसन झाले. त्यांनी केलेल्या चित्रपट दुनियाच्या सेवेला व लोकांच्या मनोरंजन सेवेला! या गोष्टी गोष्टींना त्यांना मानाचा मुजरा.