
File photo
प्रतिनिधी :मिलन शहा
विश्व् :कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी दिनांक 6 जानेवारी 2025,पंतप्रधान पदाचा आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याचा राजीनामा दिला आहे. कॅनेडियन वृत्तपत्र ग्लोब अँड मेलनुसार, कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत ते या पदावर राहतील. देशातील खासदारांच्या वाढत्या विरोधामुळे ट्रुडो यांना राजीनामा द्यावा लागला होता.
ते म्हणाले, “मी पक्षाच्या नेत्याचा, पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे आणि जोपर्यंत पक्ष पुढचा नेता निवडत नाही तोपर्यंत पदावर राहीन. काल रात्री मी लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना ती प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.” या घटने मुळे कॅनडा सहित युरोपीय देशांत चर्चान्ना उधान आले आहे. तसेच कॅनडा चे नवीन पंतप्रधान कोन होणार असा ही प्रश्न उपस्थित झाला आहे.