कॅनडा खलिस्तानी,अड्डा बनतोय का?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले जगाच्या नकाशावर,रशिया नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळ,असणारा देश कॅनडा आहे.परंतु ह्या राष्ट्राची लोकसंख्या फक्त ४ कोटीच आहे.तर आपल्या उत्तर प्रदेशाची संख्या १३ करोड आहे.इतकी कमी लोकसंख्या व विस्तीर्ण प्रदेश,हे असमिकरणीय आहे.लोकसंख्या व प्रगती व्हावी त्यासाठी हे राष्ट्र बाहेरील कुशल कामगार व कर्मचारी वर्गास येथे येण्यास प्राधान्य देतात . त्यामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.खास करून शीख समाज .१८९७ साली,केसुर सिंग हे ब्रिटिश सैन्यात,रीसालदार मेजर होते.ते पाहिले सिख म्हणून ब्रिटिश सैन्य सोबत,व्यांकुवर यथे राणी व्हिक्टोरिया ह्यांच्या,हीरक महोत्सवासाठी ताफ्यात दाखल झाले.मग ते येथेच वसले.नंतर इतर सिख आले.आता हा समाज येथे,लोकसंख्येच्या ३ र या आघाडीवर आहे.पण त्यांची नाळ भारताशी जोडलेली आहे.तर पंजाबात काही झाले तर त्याचे पडसाद,कॅनडात उठल्याशिवय रहात नाहीत.हेच भारताचे दुदैर्व आहे.एक लढवय्या जमात म्हणून नाव कमवलेल्या जमातीचे! पटितील एक्का कुजक्या अंब्याने,अख्खी पाटी खराब होते.अशी अवस्था झाली आहे.इतीहासात झाकून पाहिले असता,ब्रिटिशांच्या काळी हा पंजाब प्रांत, हा अलग स्वतंत्र होता.परंतु कालांतराने,तो भारतात विलीन झाला.पण अजूनही कांहीं शिखांची भावना,तशीच आहे.आम्ही स्वतंत्र आहोत.आम्हालाही स्वतंत्र पंजाब प्रांत पाहिजे आहे.त्याकरिता स्वर.पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या काळात, सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार ही झाले.त्यामध्ये अनेक खलिस्तानी नेते व समर्थक मारले गेले.अजूनही बंदुकीच्या गोळ्यांच्या निशान्या भितींवर्ती आहेत.तर निळ्या पगडीत हातात भाले घेऊन समर्थक आजही,तेथे दिसतात.बर कथित केल्याप्रमाणे,ह्याचे लोण व पडसाद आत्ता कॅनडात ही उमठत आहेत.आपण राहता कॅनडात,तर आपली नाळ भारताची जोडलेली आहे,खालिस्थान्यांशी नाही.याची नोंद भारतीय जनतेने घ्यावी.जर उद्या आम्ही महारष्ट्रस्थान मागू!,देशाची शकले करायची आहेत का?तर सांगा!जेंव्हा महाराष्ट्र उठेल तेव्हा!देश हाद्रेल!यात शंकाच नाही.पण छत्रपती व,बाळासाहेब ह्या दैवतानी,हे असलं आम्हाला शिकवलं नाही.रान पेटवायला वेही लागणार नाही.आम्ही देशाबरोबर एकनिष्ठ राहणार!खलिस्थनाच्या कारवाया पंजाब मध्ये करायच्या,दहशत माझवायची,मग भारत सरकारने त्यांच्यवर लाखांची इनामे लावयची.मग हे दहशतवादी,नकली पारपत्र घेऊन,कॅनडात आश्रय धेत आहेत.नुकताच एक क्रूर दहशतवादी!आतंकी तेथे पसार झाला आहे.त्याच्यावर १०लाखांचे बक्षीस आहे.तर एकाची हत्याही झालेली आहे.त्याचा आरोप भारतावर करत आहेत .हो पैसा कुणाचा?जनतेचा ना?पैश्यांची काय खैरात वाटायची.आपल शेतच आपल कुंपण खातय?म्हणून अशी क्रूर माणसे देशातून पळत आहेत.त्यावर कॅनेडियन सरकारही मूग गिळून गप्प आहे.त्या दहशतवाद्यांवर,रेड कॉर्नर नोटीस,देऊनही कॅनडा सरकार!सहकार्य करीत नाही.त्यांना भारताच्या हाती द्यावे.अशी विनवणी ही राजदूत गृहामधून,करण्यात आलेली आहे,पण व्यर्थ!कॅनडाचे पंतप्रधान,जस्टिन ट्रूडो!ह्यांना तर भारताशी दुश्मनीच,पत्कऱ्यची आहे.कारण त्यांचे वडीलही तसेच वागायचे.ही शिकवण तिकडूनच मिळाली.हेच सरकार त्या खलिस्तानी दहशतवाद्यांना खतपाणी घालीत आहेत,हका? कि कॅनडा सरकार माहीत असून ही ,तेथे कानाडोळा करीत आहे.आमच्या देशात स्थायिक व्हा! आसे कॅनडा सरकारच सांगते ,मग का सहयोग करीत नाहीत.उलट त्यांच्या विरोधात नको त्या संघटनेला सोडता?काय हा न्याय!ह्यामध्ये आपलेच लोक दोशी आहेत.कारण कोणत्याही नागरिकांची देश सोडताना,नीट चौकशी न करता,पारपत्र न तपासता तुम्ही सोड्ताय?आज कॅनडात अनेक पिढ्या भारतीय वसलेले आहेत,त्यांना कोणत्याही संघटनेने धमकी दिल्यास, कोणताही देश सोडणार नाही. सहनही करणार नाही.आत्ता दोन्ही देशांनी एकमेकांना विसा देणे बंद केले आहे.यात दोन्ही देशातले निर्दोष नागरिक भरडले जाणार ?आणि आमचे पंतप्रधान “जी२०” सारख्या परिषदा भरवत आहेत त्याचा काय उपयोग?


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *