प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई,काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.निष्पाप नागरिकांवर केलेला हा प्राणघातक हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.
काश्मीरमधील दहशतवादी कारवाया संपल्या वा कमी झालेल्या नाहीत. पहलगाम येथे तब्बल 28लोकांचे बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.
देशातील सर्व लोक या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत. हे दहशतवादी हल्ले समाजात फूट पाडण्यासाठी आणि ध्रुवीकरण करण्यासाठी रचले गेले आहेत. म्हणून आम्ही सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आणि सांप्रदायिक सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो आणि दोन्ही समाजात तेढ वाढणार नाही याची आपण सारे काळजी घेऊया.डॉ.जी.जी.पारीख, तुषार गांधी,
फिरोज मिथिबोरवाला, शरद कदम,गुड्डी, माया वाकोडे,संतोष आंबेकर,अल्लाउद्दीन शेख,नितीन वाळके,अकबर शेख,अनिल कर्णिक,जनार्दन जंगले,सुधीर राऊत, प्रवीण वाणी,मृणालिनी तुषार म्हसकर,किरण मोहिते, शाम निलंगेकर,निसार अली सय्यद , शफीक शेख, वैशाली महाडिक ,मिलन शहा,फिरोझ अन्सारी,अफ्रोझ सय्यद,अफझल अन्सारी ,इम्रान खान,फारूक अली, शाहरुख सय्यद,लालजी कोरी, मेरी चेट्टी,
हम भारत के लोग टीम