कष्टकरी अंधेरीकरांचा प्रवास…आता जागृत महाराष्ट्र वर पाहता येणार

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

कष्टकरी अंधेरीकरांचा प्रवास लघुपट तयार करण्यासाठी सर्वस्व सहकार्य मी करेन -संघर्ष यौद्धा संजय मानाजी कदम..

मुंबई,जागृत महाराष्ट्र प्रस्तुत कष्टकरी अंधेरीकरांचा प्रवास.. पेपर विक्रेता यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रकाशन सोहळा काल मुंबईतील डिन एन नगर येथील एका भव्यदिव्य हॉलमध्ये करण्यात आला. प्रथमच पेपर विक्रेत्याचा जीवन प्रवास हा जागृत वर पहावयास मिळणार आहे. या माहितीपटाचे उद्घाटन संघर्ष युद्धा, सतत महिलांना सक्षम करण्यासाठी धडपडत राहणारे,युवकांना नौकरी संधी उपलब्ध करून देणारे,अंधेरी येथील अनेक नागरिकांना रूग्णालया संदर्भात, शैक्षणिक बाबतीत सतत सहकार्य करणारे व्यक्तिमत्त्व संजय मानाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांनी संबोधित करताना सांगितले की माझ्या जीवनाशी निगडित, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग हा वृत्तपत्र आहे कारण मी सुद्धा एका काळी लहान असताना पेपर विक्रते म्हणून काम केले आहे तो पेपर विक्रतेचा प्रवास जवळून अनुभवला आहे.हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने मी जागृत महाराष्ट्रचे संपादक अमोल गौतम भालेराव यांना सांगितले की अंधेरी येथील जो जो कष्टकरी वर्ग असेल जसे की पेपर विक्रते, घरकाम करणारे महिला,दूध विक्रते, रिक्षा चालक,भाजी विक्रीते, नाले सफाई कामगार, अशा प्रत्येक विषयावर माहितीपट तयार करून त्यांच्या समस्या सरकारी दरबारी मांडण्याचे कार्य सुरू करू त्यासाठी लगणारा जो काही खर्च असेल तो मी करेल असे सांगितले.या प्रसंगी त्यांनी महत्वाचे असे सांगितले की प्रत्येक नागरीक हा दिवसातून 5 ते 8 रुपये ची चहा रोज 3,4 सहज पित असतो पण तो 5 रुपये चा एक वृत्तपत्र घरात विकत घेत नाही हे खेदजनक आहे.प्रत्येकांनी घरात 1,2 तरी पेपर आणले पाहिजे आपल्या मुलांमध्ये वाचण्याची आवड निर्माण केली पाहिजे.एकदा जर मुलांना वाचण्याची सवय लागली तर ती मुलं नकीच यशस्वी होतात.. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अंधेरी विधानसभा संघटक, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख हे महत्वाचे पद त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी एकदा ही उल्लेख केला नाही व आवर्जून सांगितले की हा उद्घाटन सोहळा कोणताही राजकीय हेतुने केलेला नाही. या प्रसंगी जागृत महाराष्ट्रचे संपादक अमोल गौतम भालेराव,यांनी सांगितले की जागृत महाराष्ट्रचा सदैव एकच प्रयत्न असतो ते म्हणजे जनसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणे ते कार्य पुढे सुरूच ठेऊ.वृत्त विक्रते यांच्या जीवनावर आधारित माहितीपट तयार करत असताना अनुभव आला की ही आता शेवटची पिढी असेल जे वृत्तपत्र विक्री करत आहेत.कारण हा व्यवसाय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.या व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी नवीन पिढीने वृत्तपत्र विकत घेणे आवश्यक आहे.
या प्रसंगी उपस्थित शाखा प्रमुख दिपक सनद, रमेश वांजळे युवा सेना विभाग अधिकारी ,संचालक सुरज भालेराव,मॅनेजर अविनाश ओवळे, लक्ष्मण डेंगळे,पेपर विक्रते सह जागृत टीमचे सहकारी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *