
प्रतिनिधी:प्रकाश जैस्वार
मुंबई,मुंबईला प्राणवायू देणाऱ्या आरे विभागात मेट्रो कार शेड बांधण्याचे भाजपा प्रणित शासनाचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. निसर्गाची नासधुस करून आरे मध्ये मेट्रो काराशेड होऊ देणार नाहीत असे असे रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. आनंदराज आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली रविवारी दि.21 रोजी धिक्कार आंदोलन करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन सेनेचे हजारो कार्यकर्ते आरेच्या पिकनिक पॉईंट, क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे जमले होते. महाराष्ट्र सरकारला मेट्रो कार शेड साठी अनेक पर्याय उपलब्ध असताना आरेची निवड का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महालक्ष्मी अथवा माटुंगा रेल्वे वर्क शॉपचा कार शेड साठी वापर करावा हा पर्याय आनंदराज आंबेडकर यांनी दिला.