
File photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाला आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती.तथापि, 26 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला.पण 18 मार्च 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर सत्येंद्र जैन यांना पुन्हा एकदा तिहार तुरुंगात जावे लागले.आता जामीन मिळाल्यानंतर सत्येंद्र जैन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांना जामीन मिळाल्याने आप चे नेते आणि कार्यकर्ते आनंदी झाले आहेत.