आमचा अस्वस्थपणा,आज आम्ही शांततेने व्यक्त केला…… शरद कदम.

Share



 आज समाजातील द्वेष वाढविण्याचे काम आरडाओरडा,गोंगाट करून घडविले जात आहे. ' ते ' आणि ' आपण ' अशी खोटी फूट पाडून समाजात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचे काम चालू आहे. द्वेष, तिरस्कार आणि हिंसा ही गोंगाट आणि प्रचंड आरडाओरड करून करावी लागते.

या सगळ्यामुळे आम्ही सर्वजण अस्वस्थ आहोत. आमचा अस्वस्थपणा आम्ही व्यक्त करत आहोत ते शांततेने…..
आम्ही मानतो की आम्ही विविध धर्माचे भारतीय एकमेकांची भावंडे आहोत. आमच्यातील वाद हे प्रेम आणि संवादातूनच सुटू शकतात.
या विचारातून आज १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबईतील आम्ही कार्यकर्ते आज सकाळी ९ ते १० या दरम्यान बोरीवली येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असलेल्या मागाठाणे डेपोच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हातात पांढरा कागद घेवून आमच्या मनातील अस्वस्थता शांतपणे उभे राहून व्यक्त केला.
या वेळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत,अभिनेता संदीप मेहता,सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे,आशुतोष शिर्के,शरद कदम,पत्रकार मुकुंद कुळे,सगुण सावंत,केतन कदम,राजश्री बने,विजय मोहिते, सकीना, मोहन थोरात, ॲड.प्रशांत जाधव,नरेश राजगुरू,दिनेश कदम, कवयत्री नीरजा,राजन धुळेकर ,राहुल वैद्य,गीता तांबे,गौरी कुलकर्णी,मनीषा कोरडे,साधना वैराळे,निखिल पवार,श्रीराम सोमण,रश्मी पटवर्धन,अमृता पटवर्धन आदी उपस्थित होते.
आज सकाळी १० ते ११ दरम्यान मालवणी,मालाड येथे राष्ट्र सेवा दलाचे निसार अली यांच्या पुढाकाराने लोकांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *