
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,36-वारा वाझुपाडू मंदिरम या संस्थेच्या वतीने एकता नगर भंडारवडा मालाड पश्चिम च्या वतीने नवनिर्मित ओमशक्ती मेलमारूवथुर आधी पराशक्ती वरावेझुपाडू मंदिराचे लोकार्पण उत्साहात संपन्न. मालाड पश्चिमेत अनेक तामिळ समाजाच्या वसत्या आहेत.अशीच एक वस्ती भंडारवाडा येथे आहे या ठिकाणी असलेल्या तमीळ समाजाची मागील अनेक वर्षांपासून इच्छा होती कि मंदिर बांधाव मात्र तब्ब्ल 19 वर्षा नंतर या ठिकाणी एक छोटा मात्र भव्य मंदिराचे निर्माण लोकवर्गणीतून स्थानिक तामिळ बांधवांनी केले. व त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पारपडला .

प्रसंगी वेलवी पूजा (यज्ञ )ॐ शक्ती चा जप कलश पूजा चे ही आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी मालाड पश्चिम चे आमदार अस्लम शेख व तसेच मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे ,माजी नगरसेवक दिपक पवार, सुनील कोळी, पंकज कपूर व इतर मान्यवरांनी तसेच शेकडो तामिळ समाजातील महिला आणि पुरुष भाविकांनी पूजा अर्चना केली व दर्शनाचे लाभ घेतला. प्रसंगी भाविकांसाठी तीर्थ प्रसाद आणि भंडाराचे ही आयोजन करण्यात आले होते.
,