प्रतिनिधी :मिलन शहा
काश्मीर :जम्मू-काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका पाहण्यासाठी16 वेगवेगळ्या देशांतील 20 राजनयिक श्रीनगरला पोहोचले आहेत.
हे सर्वजण श्रीनगर तसेच बडगाममधील मतदान केंद्रांना भेट देतील.त्यांच्या दौऱ्याचे नियोजन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
परदेशी पाहुण्यांमध्ये अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
मात्र, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने मोदी सरकारवर निशाणा साधला असून जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे तर काश्मीरमध्ये परदेशी मुत्सद्दी का आणले जात आहेत, असा सवाल करत या भेटीबाबत प्रश्न निर्माण केले आहेत.