
मुंबई, शाखा क्रमांक 96, बेहराम पाडा वांद्रे पूर्व ही शाखा पालिकेने सूचना न देता!जमीनदोस्त का केली ?
प्रतिनिधी:सुरेश बोर्ले
वांद्रे पूर्व येथील बेहराम पाड्यातील गरीब नगर, रिक्षा स्टँड जवळील 20 वर्षा जुनी , शिवसेना शाखा, पूर्व सूचना न देता,पालिकेने जमीनदोस्त केली. ही शाखा वांद्रे रेल्वे स्टेशनला लगत होती. ह्या शाखेत मध्ये, दैनंदिन व्यवहार हे मदतीची होत असायचे.ही शाखा म्हणजे रिक्षा चालकांचे, जीवणाचे हक्काचे ठिकाण व स्थान. तर काही तक्रार असो, ही शाखा म्हणजे तक्रार निवारण केंद्र होते.त्यांचे समान ठेवण्याचे, महत्वाचे ठिकाण होते.जर रिक्षामध्ये कोणी प्रवासी आपला किमती सामान्, विसरला की वाहन चालक ते येथे जमा करायचे. आणि ती वस्तू सुखरूप प्रवाशाला परत मिळायची. तर अनेक सामाजिक उपक्रम या शाखे च्या माध्यमातून परिसरात व्हायचे व ते उपक्रम सामाजिक तत्वावर लोकोपयोगी असायचे. या शाखेत बालवाडी चा वर्गही चालायचा. विशेष सांगायचे झाल्यास, मुस्लिम बहुल वस्तीत असणाऱ्या शाखेत स्वर्गीय, बाळासाहेब व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकनिष्ठ राहणारे, त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे कट्टर शिवसैनिक! हा या शाखेचा अमोल ठेवा होता.आज येथील स्थानिक जनता शिंदे साई सरकारला तकलादू,संधी साधून व स्वार्थी नेता मानतात. तर त्यांचे एकच नेते म्हणजे उद्धव ठाकरे ठामपणे आजही कार्यकर्ते सांगत आहेत. मुंबईतील नामांकित दूरचित्रवाणीवर ही दृश्य दाखवताना, त्या शाखेचे प्रमुख , फारुख भाई यांच्याशी प्रतिनिधी, बोलत असताना,ते म्हणाले की ही शाखा येथे वीस वर्षाहून,अधिक काळ आहे. आमच्याकडे याचे कागदपत्रे व पुरावे आहेत. मग या मनपा अधिकाऱ्यांनी आगाऊ सूचना देणे महत्वाचे होते, आणि मग कारवाई केली असती तर चाललं असतं. परंतु असे न करता दिनांक 22 जून रोजी सकाळी 11:40 वाजताच्या सुमारास बुलडोझर आणून ही कारवाई केली.म्हणजेच हे कुणाच्यातरी दबावाने किंवा मोठ्या पातळीवरून सांगण्यामुळे, हा प्रकार झालेला आहे.हे स्पष्ट दिसत आहे. सदर बाबत स्थानिक माजी नगरसेवक ,हलीम भाई यांनी या शाखे संबंधी संदर्भ दिला आहे,तो म्हणजे त्यांना व शाखा प्रमुख फारुख भाई यांना कांहीं दिवसापूर्वी विरोधकांकडून,निरोप आला होता की, आपण शिंदे गटात सामील व्हावे! अन्यथा आपल्याला परिणाम भोगावे लागतील? परंतु येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी त्यांना विरोध केला! त्या कारणास्तव ही शाखा आज विरोधकांकडून जमीनदोस्त करण्यात आली. स्थानिक माजी नगरसेवक ,हलीम भाई यांनी त्वरित वांद्रे मनपा वार्डात जाऊन, सदर बाबत तक्रार केली,परंतु तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला वरून आदेश आला आहे,म्हणून आम्ही ही कारवाई करत आहे.त्यावेळेस आवश्यक ती कागदपत्रे त्यांनी त्यांच्याकडे सादर केलेली आहेत. सांगायची मोठी खबर म्हणजे समोरच्या फुटपाथावर, एक नवीन शाखा स्थापन करण्यात आलेली आहे. पण तिच्यावर कारवाई का झाली नाही? हे सुद्धा माजी नगरसेवक व शाखाप्रमुख यांनी त्यांना दर्शवले. अधिकारी म्हणाले,त्या शाखेवर मी कारवाई करतो,तसे तक्रार पत्र मला द्या!तसे पत्रही तरी त्वरित त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना त्या शाखे विरोधात दिलेल आहे.कारण ती शाखा रस्त्याला लागून फुटपाथवर आहे. तर ही शाखा क्रमांक 96 वस्तीमध्ये होती.हे लोकांनी लक्षात घ्यावे. एकंदरीत काय तर विरोधकांनी, आता मुख्य शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायचा घाट रचला आहे. असा अनेकांचा ग्रह आहे. तर या कारवाईबाबत स्थानिक नेते व आमदार ऍडव्होकेट,सुनील परब यांच्यापर्यंत ही बाब पोहोचली आहे.त्यावर ते करवाई करतीलच अस आश्वासन त्यांनी दिलेलं आहे,किंवा येणाऱ्या काळात मनपावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार विरोधी, उद्धवजी,मोर्चा काढणार आहेत, त्यावेळेस हा विषय नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवू,असा विश्वास शाखा प्रमुख फारुख भाई आणि माजी नगरसेवक ,हलीम भाई यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात त्यावर, काहीतरी तोडगा निघेल, कारण त्या शाखेत सोबत त्यांनी इतर घरही जमीनदोस्त केलेली आहेत. ही कारवाई ही योग्य नाही, असे स्थानिकांचे मत आहे.

विशेष म्हणजे वांद्रे येथील बेहराम पाडात तेव्हाची शिवसेना ने मुस्लिम समाजा चा विश्वास जिंकून काँग्रेस च्या बाल्ले किल्ल्यात हे करून दाखवले होते. मात्र सद्या च्या कुरघोडी च्या राजकारणात मूळ बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक असल्याचा दावा करणारे नेतेच वेगळा गट काटकरस्थान करून स्थापन केले व मूळ शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ला संपवण्याचा घाट करत आहे या सुडाच्या राजकारणात ज्या मराठी माणसांच्या अस्मिता जगवण्याचा व सन्मानाने जगण्याचा धडा ज्या शाखा शाखातून मराठी तरुणांना मिळायचा त्याच शाखांवर बुलडोजर फिरवले जात आहे आणि ते ही शिवसेने चा मुख्यमंत्री जरी त्यांनी नवीन गट स्थापन केले असले तरी मराठी माणसांचा अपमान करने किंवा आपल्या स्व हितासाठी कुरघोडीच राजकारण करने कितपत योग्य आहे. कारण या लढाईत मराठी माणसाचीच मान खाली झुकली जात असून या मुळे आपली मुंबई , मराठी मुंबई कि नुसती मराठी मतांची विभागणी करने या साठीचे राजकारण सद्या सुरु असल्याचे मत मराठी माणूस व्यक्त होत आहे. अजून वेळ गेलेली नाही जर मुंबईतुन मूळ शिवसेना कमकुववत किंवा संपली तर मग मुंबईत गुजराती, मारवाडी शेठजी आणि उत्तर भारतीय यांच्या दबावाखाली मराठी माणसांना जगणे भाग पडेल.