
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,अनेक महिन्यांपासून,कै. रमेश मोरे उद्यानात मी स्वतः येथे फेरफटका मारीत आहे.ह्या उद्यानाच्या मागील बाजूस,आपल्याला मोठ्या प्रमाणात खडकवजा मोठाल्या दगडांचा खच पडलेला दिसत आहे.का?ही खडी पडून आहे?आज विकत घ्यायला गेल्यास,हजारो रुपयांची आहे.का ह्या वस्तूचा उपयोग, पालिका उद्यान अधिकारी योग्य ठिकाणी करीत नाहीत?शेवटी तुम्ही हा पैसा जनतेकडूनच कराच्या रूपाने वसूल करता ना!मग ती वस्तू अशी बेवारशी पडत ठेवायची का?हे चूकीच आहे.ह्याचा उपयोग तसम कर्मचारी व उद्यान अधिकाऱ्यांनी त्वरित करावा, ही लोकांची मागणी आहे.कारण ह्या पडून असलेल्या खडीने ,मोठी जागा व्यापलेली आहे.त्यामध्ये डासांनचे व कीटकांचे साम्राज्य आहे.लोकांच्या आरोग्यस धोका आहे.ती खडी योग्य ठिकाणी वापरल्यास चांगले होईल. नागरिकांना व्यवस्थित चालता फिरता येईल व लोकांच्या पैशांचा सदुपयोग योग्य होईल.याची नोंद पालिकेने घ्यावी,हा जनमानसाचा कौल आहे.आता तरी पालिका प्रशासन जागा होईल का असा प्रश्न शेवटी इथे उपस्थित होतो.