
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मालाड पश्चिमेत खारोडी येथील सेंट ज्यूडस शाळेच्या वार्षीकोत्सव दिमाखात संपन्न झाला . यावेळी नृत्य आविष्कार आणि पाणी वाचवा, पाणी हे जीवन आहे यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक उत्सवाचे आकर्षण ठरले. प्रमुख पाहुणे आमदार योगेश सागर आणि अभुदया बँकेचे संचालक प्रेमनाथ सालियन यांच्या हस्ते विविध खेळात विजेत्यांना व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सेंट ज्यूडस शाळेचे विश्वस्त स्टॅनली डिलिमा यांनी 42 वर्षांपूर्वी गरीब व गरजू कुटुंबातील तसेच अल्पसंख्यांक समाजातील मुलांसाठी शाळेची सुरुवात केली. शाळेने 42 व्या वार्षिक उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यात आला. उत्सवात सहभागी झालेले प्रमुख पाहुणे आमदार योगेश सागर यांनी
मार्गदर्शन करताना सांगितले की सद्या च्या स्थितीत शिक्षणाचे उत्तम वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वशीक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक घरातील सदस्यांची शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच धोरणाचा लाभ सर्व समाजाला होत आहे. तसेच सेंट ज्यूडस शाळेचे विश्वस्त स्टॅनली डिलिमा यांचे कौतुक केले. 42 वर्षात हजारो विध्यार्थी शिकून सुज्ञान नागरिक बनून बाहेर पडलेत कारण गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलांना कमी दरात चांगल्या शिक्षणाची संधी मिळवून दिल्याने हे शक्य झाले तसेच शाळेने उपलब्ध करून दिलेल्या संधी चे सोनं करत अल्पसंख्यांक समाजातील मुली शिक्षण धारण करत आहेत.यासाठी शाळेला जमेल ती मदत करण्याचे आश्वासन देत विज्ञान प्रयोग शाळा, कॉम्पुटर लॅब तसेच शेड बांधून देण्याचे आश्वासन सागर यांनी जाहीररित्या केले शाळेच्या प्राधानाध्यापिका लता सावंदाणे यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.
