
प्रतिनिधी : मिलन शहा.
सांगली :शिवसेना ठाकरे गटात चंद्रहार पाटिलांचा जाहीर प्रवेश!
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
चंद्रहार पाटील आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आज दुपारी चार वाजता चंद्रहार पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहेत. यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याची माहिती आहे.