मराठा आंदोलनं चिघळले,सर्वस्वी सरकार जबबदार!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

“सय्यम”ह्या शब्दाचा अर्थ सरकारला कळत नाही.कारण ह्या शब्दाने दैनंदिन जीवनात महत्वाची जागा घेतलेली आहे.प्रत्येक व्यवहारात सय्यम हा सामील असतो.मग ते विश्वातील कोणतेही क्षेत्र असो!याची प्रचिती येते.सध्याची रशिया युक्रेन,इस्राएल पॅलेस्टाईन ह्या देशानमध्ये सय्यमाचा बांध फुटल्याने काय झाले?तिसऱ्या महायुद्धाची चाहूल लागलीच ना!असा हा जालीम शब्द आहे.मराठा आंदोलनाचे च घ्या ना!गेली अनेक वर्षे आरक्षण आंदोलनासाठी हा समाज रस्त्यावर उतरत आहे.अगदी लोकशाही पद्धतिने,शिस्तीत व कोणतेही हिंसक वळण न घेता हे मोर्चे सुरळीत चालेले होते. त्यासाठी अंतरवाली सराटी येठे मराठा नेते जरांगे पाटील ह्यांनी शांतपणे आमरण उपोषणाला सुरू केले,मग नेहमीप्रमाणे सरकारी नाटके सुरू झाली.शेवटी शासनातील मोठ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने,जरांगेंनी उपोषण मागे घेतले.पण त्यावेळेस जरांगेनी कालावधी मागून घेतला.जर का ह्या कालावधीत सरकारने वचनाची दखल नाही घेतली,तर मग ते पुन्हा आमरण उपोषणास बसतील?त्या प्रमाणे ते बसले,त्यात त्यांचे काय चुकले.लोकांना माहिती आहे की सरकारी आश्वासने ही हवेत असतात.वर नमूद केल्या प्रमाणे मराठा समाजाचा सय्यमा चा बांध फुटला आणि आंदोलन चिघळले.ह्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे.यात शंका नाही,ही समाजाची ओरड आहे,त्या अक्रोशात बीड येथे जाळपोळ केली सरकारी संपत्तीची हानी केली.कांहीं ठिकाणीं साखळी उपोषण सुरू झालं,बंदची हाक आली.कारण झुलवा हा किती दिवस टिकणार?झुलवायची कामे ही सरकारी मंडळी करतात.त्यांना हे चांगल जमत.मग त्याचे परिणाम भोगा आता!आज साताऱ्यातील छत्रपती वंशज मा.शाहू महाराज जरांगे साहेबानकडे कांहीतरी तोडगा काढायला जात आहेत,आरे!सरकार दरबारी मराठा समाजातील आमदार खासदारांना लाजा वाटल्या पाहिजेत.आज महाराजांच्या वांशवलीला उत्रावे लागत आहे.ह्या महाराष्ट्रासाठी व राष्ट्रा साठी ह्या समाजाचे ऋण आहेत,हे शासन विसरले वाटते.तर आत्ता ह्या समाजाला खस्ता खायला लावताय.हे कितपत योग्य आहे.अगदी शांतपणे चाललेले हे आंदोलनं शेवटी हिंसक बनले.याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारच आहे,असे लोक म्हणत आहेत.मग ह्या सगळ्यांची धावपळ सुरू झाली.मुख्यमंत्री तातडीची बैठक आपल्या बंगल्यावर घत आहेत.ही कामे तुम्ही आधी करायला हवी होती.मग ही आत्ताची परिस्थिती आली नसती.आत्ता पोलिसांना कायदा व सुव्यवस्था आबाधित आदेश,144 कलम लागू करा,संचार बंधी लावा,हे सरकार आत्ता करतय?त्यांच्या पोकळ अस्वसंनामुळेच ना?मराठा समाजाला तयांच्या परिस्थितीनुसार आरक्षण द्या.ज्यांना आवक्षकता आहे त्यांना द्या.योग्य पडताळणी करा!मगच निर्णय घ्या.म्हणजे तुम्हाला हिरव्यांचे,निळ्यानचे हिंसक आंदोलने चालतात,त्यासाठी तुम्ही स्वतः मंत्रालयातून खाली उतरता.कारण तुमची व्होट बँक आहे.हा मराठा अनेक पक्षात विभागलेला आहे.याचा फायदा तुम्ही घेत आहात.म्हणजे तुम्ही स्वार्थी राजकारण जाती जातींमध्ये करताय?हे कितपत योग्य आहे.ही नोंद जनतेने घेतलेली आहे.मराठा समाजाचा बांध फुटलेला आहे.म्हणून ही आक्रोशाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता ह्या समाजाने,कोणत्याही इतर पक्षात रमु नये.सकल समाजाने आत्ता एकसंध होऊन,एक स्वतंत्र पक्ष निर्माण करावा.तुम्हाला एक गठ्ठा येणं आवश्यक आहे.आत्ता येणाऱ्या मतदानात आपली ताकत तयार करा.मग हे मराठा असूनही स्व जातीला शिव्या घालणारे कणकवलीकर, कांदिवली वाले,तिरला वकील,नागपूरकर,साली माळी हे तूमच्या गिंनतीत राहणार नाही.त्यांना त्यांची जागा दाखवा.स्वतःचा पक्ष काढा,कशाला आपली ताकत विखुरलेल्या पक्षांसाठी मोफत घालवताय आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेताय.येणार मतदान हे तुमच्या समाजासाठी व फित्तुर मंडळींना,धडा शिकवून त्यांच्याच तोंडावर त्यांना पाडायची आयती संधी आलेली आहे,ती घालवू नका.याची नोंद सकल मराठा समाजाने घ्यायची आहे आणि जोरदार धडक सरकारला देऊन,समाजाची ताकत दाखवायची आहे.अशी परिस्थिती निर्माण करा!तरच तुम्हाला मनासारखे आरक्षण मिळेल.कारण सरकार तुम्हाला आरक्षण देण्याच्या स्थितीमध्ये नाही.त्यांना आणखीन काय पाहायचे आहेत.तुम्हाला दिले तर इतरही उठतील?ते पाहणं सरकारची जबाबदारी आहे.कसही करून हे आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्या.आपल्या समाजाचा उद्धार करा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *