बाल वैज्ञानिकांची फसवणूक थांबेल का?टीडीएफ

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,नुकताच देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला,देशातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, बाल वैज्ञानिक तयार व्हावेत,विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व बुद्धीला चालना मिळावी व त्यातून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत म्हणून शाळास्तरावरून, तालुका, जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शने दरवर्षी भरविण्यात येतात,प्रत्येक स्तरावर विज्ञान क्षेत्रातील तज्ञ  सर्व प्रोजेक्ट चे काटेकोर परीक्षण करुन तालुका व जिल्हा स्तरावर उत्कृष्ठ विज्ञान प्रोजेक्ट निवडलेले प्रोजेक्ट राज्य स्तरावर पाठवले जातात, त्यासाठी मार्गदर्शन तत्वे शिक्षणं खात्याने परिपत्रकाद्वारे जाहिर केलेले आहेत,परंतू यावर्षी सर्व मार्गदर्शन तत्वांचा भंग करून वशीलेबाजीने राज्य स्तरावरील प्रोजेक्ट निवडले गेले, त्या मार्गदर्शन तत्वां नुसार कोणताही प्रोजेक्ट मागील वर्षात रिपीट झालेला नसावा, तसेच बाजारातून आयते साहित्य वापरून विज्ञान प्रोजेक्ट तयार केलेला नसावा तथापि अमरावती येथे भरलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक व माध्यमिक विभागांत ( विद्यार्थी व शिक्षक गट) अनेक प्रोजेक्ट रिपीट झालेले होते तर काही प्रोजेक्ट दुकानातून साहित्य विकत घेऊन बनविलेले होते, अशा तक्रारी अमरावती येथे भरलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील संबंधित आयोजक व संचालक यांचेकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही सर्व मार्गदर्शक तत्वे डावलून राज्य स्तरावरील अनेक चुकीचे प्रोजेक्ट सिलेक्ट होऊन केंद्र स्तरावर निवडले गेले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असुन वर्षभर अभ्यासपूर्ण मेहनत घेणारे प्रज्ञावंत विद्यार्थी आणि त्यांना भरपूर वेळ देऊन मार्गदर्शन करणारे शिक्षक नाराज झाले असून अशा अतिशय चुकीचे प्रकारामुळे खरे वैज्ञानिक भविष्यात तयार होणार नाहीत.

    याचे दुरगामी परिणाम विद्यार्थी, शिक्षकांवर होऊन भविष्यातील वैज्ञानिक तयार करण्याची राज्याची परंपरा खंडीत होईल तरी तात्काळ योग्य ते निर्देश देऊन सदर बेकायदेशीर विज्ञान प्रोजेक्ट निवड प्रकरणी विषयातील तज्ञ मार्गदर्शकांची चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, चौकशी पूर्ण होईपर्यंत आक्षेप घेतलेले प्रोजेक्ट केंद्रावर पाठविण्याचे निर्णय स्थगित करावे अशी मागणी शिक्षक लोकशाही आघाडी (TDF ) चे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *