
प्रतिनिधी :उत्कर्ष बोरले
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ‘ तळे ‘ गावच्या ‘ पोलीस पाटील ‘ पदावर अनिल कळंबटे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
या निवडी बद्द्ल आज त्यांचा सत्कार तळेकांटे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश गुरव,ग्रामपंचायत सदस्य तुषार गुरव,मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
लोकांच्या अडीअडचणी सोबत मी असेन.पोलीस पाटील या पदाची शान जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीन असे नूतन पोलीस पाटील अनिल कळंबटे यांनी यावेळी सांगितले.
