
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
पावसाची अनियमितता, बिघडलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता जंगल जगवणे आणि ते वाढविणे हाच उपाय उरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी जवळील तळेकांटे या गावातील गावठाण भागात राहणारे तुषार गुरव,पोलीस पाटील असलेले अनिल कळबांटे,माजी सरपंच सुरेश गुरव आदी या परिसरातील लोकांनी शाळेच्या परिसरात शिक्षक,विद्यार्थी यांना सोबत आज वृक्षारोपण केले.
वड,पिंपळ,चिंच, बहावा, सिल्व्हर ओक अशा प्रकारची झाडे या परिसरात लावली गेली.
शाळेतील शिक्षक राजेंद्र जांभळे , सुलभा जाधव,संतोष गुरव,शरद कदम आणि शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची उपस्थिती यावेळी होती.
