प्रतिनिधी :सुरेश बोरले

क्रिकेट हा खेळ म्हणतात जेंटलमॅन खेळ आहे. हो त्याकाळी ब्रिटिशांना,लोक जंटलमन म्हणत होते. ब्रिटिशांनी साधारणपणे 17 व्या शतकाच्या मध्यात हा खेळ,त्यांनी सुरू केला. त्यामध्ये ब्रिटिश कालीन श्रीलंका भारत व पाकिस्तान हे देश त्यांच्या अधिपत्या खाली होते.पण या गोऱ्या लोकांच्या खेळाच्या समयी व्यवस्था करायला तेथील स्थानिकच माणसे गुलाम म्हणून होतीच.त्यामुळे येथील स्थानिकांना त्यावेळी लागले क्रिकेटचे वेध. भारतातून ब्रिटिश गेले पण हा खेळ हिंदुस्तानासाठी ठेवून गेले. भारताने अनेक मोहरे क्रिकेटला दिले, त्यामध्ये खेळाडूंनी विक्रमादित्य कामगिरी केली. त्यामध्ये खास करून सर सुनील गावस्कर,कपिलदेव
निखंज. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. तसा भारतीय राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. परंतु क्रिकेट मध्ये असणारी लोकप्रियता व मिळणारा पैसा! ही आकर्षणे आहेत.पण आज आजच्या घडीला जे आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 50 षटके, 20 षटके, अंडर आम, तरफ क्रिकेट. असे अनेक प्रकारचे क्रिकेट आज खेळले जात आहेत. आणि त्यामध्ये रंगी बेरंगी पोशाखात खेळाडू दिसतात, ही सगळी देण आहे ती, स्वर्गीय केरी पॅकर यांची. त्यांचे संपूर्ण नाव कॅरी फ्रान्सिस बुलमोहर पॅकर .17 डिसेंबर, 1937 आली त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला.श्रीमंत आणि शक्तिशाली माध्यमांचे ते करते होते. मीडियाचे20 व्या शतकातील चॅनेल 9 माध्यमांचे बादशाह होते.तसेच प्रमाणे चॅनेल 9 हा त्यांचा हुकमी एक्का होताच!संपूर्ण ऑस्ट्रेलिया व आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅनेल 9 ची ख्याती होती. पांढऱ्या पोशाखात खेळला जाणार चेंडू पळीचा खेळ, यामध्ये खेळात त्यांनी क्रांतीआणायची होती,म्हणून त्यांनी 1976 /77 मध्ये जागतिक क्रिकेट हे एका छताखाली आणून, ते धंदेवाईक करून, त्यांनाआर्थिक प्राप्त करायची होती. शिवाय खेळाडूं नाही मोठा आर्थिक लाभ मिळेल, असं त्यांना करायचं होत. शिवाय चॅनल 9 हे प्रसिद्ध दृकश्राव्य माध्यम त्यांच्या स्वतःचं होतं,मग त्या गोष्टी कठीण नव्हत्या. त्यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रिकेटची ही जत्रा जमवायला जागतिक पातळीवरचे खेळाडू लागणार?मग त्या खेळाडूंन असणारा, त्यांच्यावर त्या राष्ट्राच्या क्रिकेट संस्थेचा पडगा.त्या राष्ट्राच्या बोर्डाची खेळाडूंवर हुकूमत असणार. हे त्यांना माहित होते. त्या राष्ट्राचे बोर्ड हे,आयसीसीच्या नियम व अधिपत्याखाली असणार त्यांना हेही माहित होते. परंतु त्यांना क्रिकेटमध्ये क्रांती व धंदेवाईपणा आणायचा होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,पाकिस्तान, वेस्टइंडीज सारखे बलाढ्य संघ होते. त्याशिवाय आय सी सी बरोबर पंगा घ्यावा लागणार होता.त्याच्याशिवाय चॅनेल नाईन, हे रंगणार नव्हते. मग त्यांनी वरील सगळ्या संघातील नुकत्याच निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या खेळाडूंशी संपर्क साधला.त्यात त्यांना यशही आले मग सुरू झाले क्रिकेट मधे बदल, पांढऱ्या पोशाखा ऐवजी प्रत्येक संघाचे वेगवेगळे रंगांचे पेहराव व पोशाखांची उधळण झाली. हे सामने प्रथम विद्युत झोतात प्रथमच खेळवले गेले.मर्यादित शटकांचे सामाने सुरू झाले. म्हणजेच दिवस-रात्र क्रिकेटचा श्री गणेशा सुरू झाला. त्या वेळेला वरील संघांच्या नामवंत खेळाडूंनी या चॅनेल ९ च्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला. त्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बोर्डाबरोबर बंडखोरी केली. सगळे नामचीन खेळाडू खेळू लागले. पण त्यांची अवस्था फार बिकट झाली. एका ठिकाणी राष्ट्रीय क्रिकेट बरोबर बंडखोरी, तर दुसरीकडे कॅरी पॅकर सामन्यांमध्ये मिळणारा अमाप पैसा! पैसा कुणाला नको होता? ते सर्व खेळाडू सगळ्या वादादित गोष्टी जुगारून, कॅरी पॅकेर या स्पर्धेच्या नावाखाली खेळत राहिले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था,त्या ठिकाणी आडवी आली. त्यांनी कॅरी प्याकर ही संस्था खाजगी आहे,त्यामुळे तुम्हाला या संस्थेबरोबर खेळायचे असल्यास तुम्हाला तुमच्या बोर्डापासून लांब व्हावे लागेल तसा नियमच आंतरराष्ट्रीय पातळीवर आणला, त्यामुळे त्यातील काय खेळाडूवर कारवाई झाली.तर काही आपल्या राष्ट्रीय संघात परतले. येथे प्रकरण संपले, कॅरी पॅकर्स यांच्या स्पर्धा बंद पडल्या. पण कॅरी पॅकर यांनी आणलेल्या नवीन क्रिकेटची क्रांति,ती अर्थात एकदिवसीय दिवस रात्र क्रिकेट सामने व त्यामध्ये , रंगीबेरंगी पोशाख या प्रकाराला मान्यता दिली. कारण पॅकर यांनी क्रिकेटची केलेली क्रांती पुढे क्रिकेटमध्ये अनिवार्य झाली! नाही, ती लोकप्रियता मिळण्यासाठी करावी लागली. आज जगातील मोठी स्पर्धा आयपीएल मध्ये आपण पाहतो की प्रत्येक संघाचे विविध पोषक घातलेले खेळाडू,दिवस रात्र क्रिकेट खेळतात. शिवाय आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेला जोर लागलेला असतो. तर भारतीय जनता क्रिकेटसाठी अतिशय वेडी आहे. या स्पर्धेतून मनोरंजन व्हावे,या दृष्टिकोनातून लोक महागडी तिकीट देखील खरेदी करून , ही स्पर्धा पाहायला गर्दी करतात. या स्पर्धेला सुद्धा प्रामाणित मान्यता नाही. स्पर्धा मनोरंजन म्हणून ओळखली जाते. ही सगळी देण आहे ती, स्वर्गीय, कॅरी पॅकर्स व त्यांच्या टीव्ही नाईन या माध्यमाची. आज क्रिकेटच्या या स्पर्धेमुळे, जगातील सगळे खंड जवळ येत आहेत. राष्ट्र पातळीवर सगळ्या राष्ट्रांचा ताळ मेळ वाढतोय आणि लोकांच्या मनोरंजना सहित, खेळाडूंची उन्नती होत आहे . आपसातील स्पर्धेमुळे आपला फॉर्म टिकवण्यासाठी हा मंच चांगला आहे.त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळत आहे. प्रत्येक खेळाडू हा मेहनत करतोय. ही सगळी मेहरबानी आहे, ती स्वर्गीय. कॅरी पॅकर्स यांची! हे विसरून चालणार नाही.