आता वाघालाही हृदयविकाराचा झटका येऊ लागला..
मिलन शहा.
सद्याच्या काळात माणूस तर माणूस वाघाला ही हृदय विकाराने मृत्यू च्या बातम्या येवू लागल्याने वन विभागाची चिंता वाढू लागली आहे.
दि.29 नोव्हेंबर रोजी वयाच्या दहाव्या वर्षी कानपूर प्राणीसंग्रहालयात वाघाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला दि. 26नोव्हेंबर रोजी कानपूर प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते.या वाघाने लखीमपूर जिल्ह्यात 2दोन जणांचा बळी घेतला होता.वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर या वाघिणीला पकडले आणि तेथून कानपूरला पाठवण्यात आले होते.